आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायपूरमधील या घरात पुरले आई-वडिलांचे मृतदेह, गर्लफ्रेंड मर्डर प्रकरणातील आरोपीची कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूरमधील या बंगल्यात आई-वडिलांसोबत राहात होता उद्यन. - Divya Marathi
रायपूरमधील या बंगल्यात आई-वडिलांसोबत राहात होता उद्यन.
रायपूर (छत्तीसगड) - भोपाळमध्ये गर्लफ्रेंडच्या हत्येच्या आरोपात अटक केलेल्या उद्यन दासचे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालेल आहे. हायप्रोफाइल मर्डर केसचा आरोपी उद्यन दास याने आई-वडिलांचीही हत्या केल्याचे शनिवारी कबूल केले होते. त्यांना रायपूर येथील ज्या घरात पुरले ते सुंदर नगरमध्ये आहे. उदयनने हे घर पॉवर ऑफ अॅटॉर्नी द्वारे हरीश कुमार पांडे यांना विक्री केले. ते सध्या येथे राहातात. 
 
- व्यवसायाने वकील असलेले हरीश यांचे म्हणणे आहे की उद्यनबद्दलची माहिती मीडियाच्या माध्यमातूनच कळाली.
- आकांक्षाच्या हत्येनंतर उदयनने घरातच तिच्या मृतदेहावर थडगे बांधले होते. रायपूरमधील ज्या घरात अॅड. हरीश राहातात  येथे उद्यनने आई-वडिलांसोबत असेच केले होते. 
- माध्यमकर्मी जेव्हा अॅड. हरीश यांनी खरेदी केलेल्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. आपण अशा घरात राहात आहोत, जिथे दोन जणांना पुरलेले आहे.
- हरीश यांनी सांगितले, की त्यांनी हे घर 2013-14 मध्ये सुरेश दुआ नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केले होते.
- उद्यनने सुरेश दुआ यांना पॉवर ऑफ अॅटॉर्नी करुन दिली होती. हे घर उदयनची आई इंद्राणी दास यांच्या नावे असल्याची माहिती समोर आली आहे.
- अॅड. हरीश यांचे म्हणणे आहे की त्यांची आणि उद्यनची कधीही भेट झाली नाही. 
शेजारी उद्यनला ओळखतात... 
- अॅड. हरीश यांच्या घराशेजारी राहाण्याऱ्या लोकांनी उद्यनला ओळखत असल्याचे सांगितले.
- अशी माहिती आहे की उदयन रायपूरमध्ये त्याची आई माजी पोलिस अधिकारी इंद्राणी दास आणि वडील व्ही.के.दास यांच्यासोबत राहात होता.
- उद्यन आणि त्याच्या कुटुंबाचे शेजाऱ्यांसोबत फार संवाद नव्हता. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणाला फारसे माहित नाही.
- शेजाऱ्यांनी सांगितले की इंद्राणी आणि त्यांच्या पतीच्या निधनाचे कारण आजारपण असल्याचे सांगितले गेले होते.
- त्या दोघांची उद्यनने हत्या केली आणि त्यांना घरातच पुरले हे माध्यमांमधूनच कळाल्याचे शेजारी म्हणाले.
- उद्यनला भोपाळ पोलिसांनी अटक केली असून त्याने जी कथा सांगितली त्याची सत्यता तपासण्यासाठी पोलिस रायपूरला पोहोचले आहेत.
आई-वडिलांबद्दल काय सांगितले 
- भोपाळ पोलिसांच्या चौकशीत उद्यनने सांगतिले, की 2011 मध्ये त्याने आई-वडिलांचा खून केला होता.
- त्यानंतर त्याने रायपूर येथील घरातच दोघांचे मृतदेह पुरले आणि त्या घराची विक्री केली होती.
काय आहे पूर्ण प्रकरण 
- पश्चिम बंगालमधील बांकुरा येथील आकांक्षा उर्फ श्वेता (28) हिची उद्यन नावाच्या मुलासोबत ऑर्कूटवर भेट झाली होती. 
- जून 2016 मध्ये ती नोकरीच्या निमित्ताने भोपाळला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. भोपाळमध्ये ती उद्यनसोबत राहात होती. 
- बांकुरा येथे राहाणारे तिचे वडील देवेंद्र कुमार शर्मा आणि आईला तिने ती न्यूयॉर्क मध्ये राहात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ती फक्त मेसेजद्वारे संपर्कात होती.
- जुलै 2016 पासून आकांक्षाचा कुटुंबियांसोबत संपर्क बंद झाला होता. तिच्या भावाने फोन नंबर ट्रेस केला तर लोकेशन भोपाळ असल्याचे कळाले. 
- कुटुंबियांचा संशय होता की आकांक्षा उद्यनसोबत राहात असणार. डिसेंबर 2016 मध्ये त्यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दिली होती.
- एक महिना तपास केल्यानंतर पोलिस तिचा बॉयफ्रेंड उद्यनच्या घरी पोहोचले. 
- तो घरात होता मात्र बाहेरून घराला कुलूप लावलेले होते. त्याने पोलिसांना आतून कुलूपाची चावी दिली. 
- पोलिस चौकशीत उद्यनने आकांक्षाची हत्या केल्याचे कबूल केले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...