आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना अँटी भाजप नाही, समविचारी पक्षांना सोबत घेऊन गोवा विधानसभा लढविणार - उद्धव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी (गोवा) - आगामी गोवा विधानसभा निवडणूक शिवसेना गंभीरपणे लढणार आहे. वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचसोबत शिवसेना चर्चा करीत असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रोजी-रोटीसाठी गोव्यातील एकही माणूस गोव्याबाहेर जाणार नाही, असे सरकार देण्याचा प्रयत्न शिवसेना करेल, असे सांगतानाच महाराष्ट्राबाहेर शिवसेना-भाजप युती झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला खासदार संजय राऊत आणि पक्षाचे गोव्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे
- शिवसेना येथे येते आणि जाते, मधल्या काळात काही करीत नाही. ही चूक उद्धव यांनी मान्य केली आहे. आता यापुढे ही चूक होणार नाही, ती सुधारण्यासाठी खासदार संजय राऊत यांच्यासारखा जबाबदार नेता येथे नेमलेला आहे.
- दोन-तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात सेनेचा मुख्यमंत्री होईल असा दावा नाही, मात्र येथील काही चांगले लोक सोबत घेऊन किती आणि कोणत्या जागा लढवायच्या यावर चर्चा करुन त्याचे उत्तर दिवाळीनंतर देऊ.
- वेलिंगकरांसोबत काम करण्याची अनौपचारिक चर्चा झाली आहे. त्यांनी सेनेसोबत काम करण्यासाठी तत्वतः मान्यता दिली आहे. संजय राऊत त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्यासोबतच्या चर्चेनंतर जागा कोणत्या आणि किती हे ठरविले जाईल.
- शिवसेनेला येथून मोठी आपेक्षा नाही. मात्र यापुढे शिवसेना महाराष्ट्रात ज्या मुद्यांवर काम करते त्याच मुद्द्यांवर गोव्यात काम करणार आहे.
- जागावाटपाची चर्चा दिवाळीनंतर होईल त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या चर्चेला सुरुवात होईल.
- मातृभाषेचा प्रश्न दुर्लक्षिला जात असेल तर आपल्या अस्तित्वालाच धक्का बसतो. त्यामुळे तो मुद्दा असेलच असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.
- भाजप बरोबर महाराष्ट्राबाहेर कुठेही युती झालेली नाही, त्यामुळे युती तुटली, हे म्हणणेच योग्य नसल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात उद्धव ठाकरे म्हणाले.
- शिवसेना हिंदूत्ववादी आहेच. त्यात दुमत नाही.
- दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारे शिवसेनेचे हिंदूत्व नाही.
- भाजप सरकारचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, भूमीपूत्रांची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी. लोक नोकरी-धंद्यासाठी परराज्यात जात असतील तर हा सरकारचा करंटेपणा.
- कोणत्याही धर्माला शिवसेनेचा कधीही विरोध झालेला नाही. कॅथलिक ख्रिश्चनांना आमचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही.
- गोव्यात अनेक कॅथलिक लोक शिवसेनेते आहेत. कालही काहींनी प्रवेश केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
- गोव्यात पाऊल टाकतानांच भाषिक वाद होऊ नये अशी आमची इच्छा आहे. मराठी आमची मातृभाषा आहे तर कोकणी आमची मावशी असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
- गोवेकरांना अपेक्षित होत्या त्या गोष्टी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहील. असे सांगतानाच शिवसेना अँटी भाजप नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
बातम्या आणखी आहेत...