आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू राष्ट्र संकल्पनेसाठी मोहन भागवत यांना मनातून पाठिंबा: उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राष्ट्रपती पदावर आपली भूमिका स्पष्ट केली. (फाईल) - Divya Marathi
एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राष्ट्रपती पदावर आपली भूमिका स्पष्ट केली. (फाईल)
मुंबई- राष्ट्रपतिपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांना आपला मनापासून पाठिंबा असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजप याबाबत अनुत्सुक का आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

उद्धव म्हणाले, ‘भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची राज्यपालपदी नियुक्ती करू शकतो, मग भागवत यांना राष्ट्रपतिपद देण्यास काय अडचण आहे?’ भागवत देशाचे राष्ट्रपती व्हावेत ही आपली तीव्र इच्छा असल्याचे ते म्हणाले. हिंदू राष्ट्राच्या आमच्या संकल्पाच्या दृष्टीने भागवत सर्वात योग्य उमेदवार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, सुकमामध्ये शहीद झालेल्या २५ जवानांचा उल्लेख करून उद्धव यांनी केंद्रावर टीका केली. नोटाबंदी छत्तीसगड आणि काश्मीरमध्ये यशस्वी होऊ शकलेली नाही, हे हा हल्ला म्हणजे उत्तम उदाहरण असल्याचे उद्धव म्हणाले.

हिंदूराष्ट्र संकल्पनेसाठी भागवत हेच योग्य
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना, हिंदू राष्ट्र संकल्पना साकारण्याच्या दृष्टीकोनातून भागवत हेच राष्ट्रपती पदासाठी पात्र उमेदवार ठरतील. इतरत्र महत्वाच्या ठिकाणी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्यांची नेमणूक करतोच, मग भागवत यांना राष्ट्रपती करण्यात काहीच हरकत नाही.
 
मनापासून भागवतांचे नाव सूचवले
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आपले गुरू आहेत असे सांगितले होते. त्यांना पद्मविभूषण देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला. कुणाच्या मनात काय? हे मला सांगता येणार नाही. कित्येक वर्षानंतर (भाजपची) एकहाती सत्ता आली आहे. मला माझ्या मनापासून वाटले म्हणून भागवत यांचे नाव सूचवले आहे." असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 
 
संजय राऊत यांचेही समर्थन
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपती करा अशी मागणी केली. हिंदू राष्ट्रचे स्वप्न साकारण्यासाठी भागवत यांना राष्ट्रपती करा असेही राऊत म्हणाले होते.
 
ऐका आणि सोडून द्या - भागवत
विविध स्तरातून राष्ट्रपती पदासाठी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे नाव पुढे येत असताना मार्च महिन्यात त्यांनी स्वत: या विषयी आपली भूमिका स्पष्ट केली. डॉ. भागवत म्हणाले, राष्ट्रपतिपदासाठी होत असलेली माझ्या नावाची चर्चा म्हणजे माध्यमांतील केवळ मनोरंजक वार्ता आहेत. त्यामुळे, त्या ऐका आणि सोडून द्या. संघात येताना इतर सर्व दरवाजे बंद केले होते. राष्ट्रपतिपदाचा प्रस्ताव आला तरीही, मिळाले तरी स्वीकारणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनीही आपल्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
 
बातम्या आणखी आहेत...