आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: कुतुबमीनारपेक्षाही उंच पुल, 50 पुल आणि दहा बोगद्यांतून जाणार रेल्वे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पिलरची उंची 85 मीटर, कुतुबमीनारची उंची 73 मीटर, पुलाची एकूण लांबी 308 मीटर)

जालंदर- या प्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा हे सुध्दा उपस्थित राहतील. 25 किलोमिटर लांब या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाची सर्व तयारी झाली आहे. या मार्गावरून जाणारी रेल्वे पन्नास पुल आणि पर्वतांच्या छातीतून बनवलेल्या दहा बोगद्यांतून जाईल. या रेल्वेमार्गातील एक पुल तर कुतुबमिनार पेक्षाही जास्त उंच आहे, तर या बोगद्यांची लांबी 10.936 किलोमीटर एवढी आहे.

विदेशी तंत्राचा वापर
हा रेल्वेमार्ग बनवण्यासाठी शंभरच्या जवळपास इंजिनिअर्सनी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. अनेकवेळा त्यांना अपयशालाही सामोरे जावे लागले. मात्र त्यांनी हिम्मत नाही सोडली. वेळ पडलीच तर त्यांनी विदेशी तंत्राचा वापरही केला. या प्रकल्पात पैसा पाण्यासारखा वापरण्यात आला आहे.
9 बोगद्यांमध्ये डीएन्डबी पध्दत आणि एका बोगद्यात एनएटीएम पध्दतीचा वापर
चीफ इंजिनिअर संदीप गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत जेवढे बोगदे तयार करण्यात आले आहेत, तेथे ड्रील अॅन्ड ब्लास्ट पध्दतीचा वापर करण्यात आला आहे. या रेल्वेमार्गावर बनलेल्या नऊ बोगद्यांमध्येही याच पध्दतीचा वापर करण्यात आला आहे. जिथे गरज वाटली तेथे मशीनच्या साह्याने ड्रील न करता तेथे स्फोटके लावून ब्लास्ट करण्यात येते. एनएटीएममध्ये ब्लास्टचा वापर होत नाही. यात पर्वताला मशिनच्या आधारे थोडे-थोडे कापले जाते. तसेच स्फोटके लावण्यात येतात. यानंतर काँक्रीटीकरणाचे काम सुरू होते.


फॅक्ट फाइल-

- ऊधमपुर-कटरा अंतर: 25.624 किमी
- प्रोजेक्टची सुरूवात : 1996-97 मध्ये
- सुरूवातीला खर्च : 183.28 कोटी
- एकूण खर्च: 1090 कोटी
- एकूण बोगदे: 10
- एकूण पुल : 50
- एकूण स्टेशन: 02

बोगद्यामध्ये सुरक्षेचे उपाय
- विंड वेलोसिटी सेंसर
- ट्रेन लोकेशन सेंसर
- फायर फाइटिंग इक्विपमेंट
- डायरेक्शन बोर्ड
- ऑटोमेटिक हूटर
- जीआरपीची 24 तास ड्यूटी

(सर्व फोटो - दिपक कुमार)

रेल्वेमार्ग आणि त्याच्या सुविधांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा.