आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UGCने जाहीर केली देशातील 21 बोगस विद्यापीठांची नावे, वाचा यादी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोयंबत्तूर- विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युनिव्हर्सिटी ग्रांट कमीशनने (UGC) आज (बुधवार) देशातील 21 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. युजीसीच्या अधिकृत वेबसाइटवर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीतील सर्व विद्यापीठांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले नसल्याचे युजीसीने म्हटले आहे.

सर्वाधिक बोगस विद्यापीठे उत्तर प्रदेशात
देशात सर्वाधिक बोगस विद्यापीठे ही उत्तर प्रदेशात आहेत. उत्तर प्रदेशात एकूण 8 विद्यापीठे बोगस असल्याचे युजीसीने म्हटले आहे. दिल्लीत सहा तर तमिळनाडु, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालमध्येप प्रत्येकी एक-एक बोगस विद्यापीठ असल्याचा खुलासा युजीसीने जाहीर केलेल्या यादीतून झाला आहे.

काय आहेत नियम...
युजीसी अॅक्ट 1956 च्या सेक्शन 3 नुसार, केंद्र, राज्य, प्रोव्हिन्शियल अॅक्ट किंवा डीम्ड इनिस्टट्युटची मान्यता असलेली विद्यापीठे प्रमाणित आहेत. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन या विद्यापीठांना करणे बंधनकारक असते. याशिवाय देशातील ज्या संस्था स्वत:ला एक विद्यापीठ म्हणून मिरवतात, ते सर्व बोगस विद्यापीठे आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, देशभरातील 21 बोगस विद्यापीठांची नावे...