आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunni Ulema Council's Delegation Met RSS General Secretary Indresh On Monday

आम्ही वंदे मातरम् म्हणावे असे वाटते का? मौलवींचा सवाल, संघाला विचारले सहा प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - सुन्नीउलेमा परिषदेचे महासचिव हाजी महंमद सलीस यांच्या नेतृत्वातील मौलवींनी आरएसएसचे ज्येष्ठ नेते इंद्रेश यांची भेट घेऊन त्यांना सहा प्रश्न विचारले. इंद्रेश मौलवींच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत. उलट हे प्रश्न वाचून ते कमालीचे चिडले, असा दावा सलीस यांनी केला आहे.
फोटो - इंद्रेश आणि मुस्लिम मौलवी.

संघाच्या अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी असलेल्या इंद्रेश यांना एक मौलवी म्हणाले की, संघाची मुस्लिमांकडून काय अपेक्षा आहे? आम्ही वंदे मातरम् म्हणावे आणि संघाने तयार केलेल्या भारत मातेच्या फोटोसमोर नतमस्तक व्हावे का? असेही इंद्रेश यांना विचारण्यात आले आहे. पण त्यावर इंद्रेश यांना राग आला असे सुन्नी उलेमा काऊन्सिलचे सरचिटणीस हाजी मोहम्मद सलीस यांनी सांगितले. तसेच मुस्लिम संघटनांनी एका परिषदेचे आयोजन करावे त्यात त्यांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असेही इंद्रेश म्हणाले.
मुस्लिम मौलवींनी विचारलेले सहा प्रश्न
- आरएसएस भारताला िहंदू राष्ट्र मानते काय?
- भारताचे रूपांतर हिंदू राष्ट्रात करण्याचा आरएसएसचा अजेंडा आहे काय?
- हे हिंदू राष्ट्र हिंदूंच्या धर्मग्रंथांप्रमाणे असेल की त्यासाठी आरएसएसने नवीन तत्त्वज्ञान मांडले आहे?
- धर्मांतर घडवून आरएसएसला काय साध्य करायचे आहे?
- आरएसएसला मुस्लिमांकडून कोणत्या राष्ट्रप्रेमाची अपेक्षा आहे?
- आरएसएस इस्लामकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते?

इंद्रेश निरुत्तर...
हे सहा प्रश्न विचारल्यानंतर इंद्रेश निरुत्तर झाल्याचे सलीस यांनी सांगितले. त्यावरून आरएसएसकडे कोणताही योजनाबद्ध कार्यक्रम नसून ते केवळ हिंदु राष्ट्राच्या मुद्यावर आरडा ओरड करत अशल्याचे सिद्ध होते, असेही ते म्हणाले. सलीस म्हणाले की, हिंदु धर्मग्रथांचा आधार घेऊन हिंदु राष्ट्र बनवले तर दलितांना पुन्हा मंदिरांमध्ये जाण्यावर बंदी होऊ शकते.

मुस्लिमांना धर्म सोडण्याचा अधिकार
उलेमा सलीस म्हणाले की, जेव्हा संविधानात धर्माबाबात स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे तर आरएसएस धर्मांतर विरोधी कायद्याला का घाबरत आहे. आम्ही तर त्याला घाबरत नाही. जर एखाद्या मुस्लिमाला इस्लाममध्ये राहायचे नसेल तर त्याला धर्मत्याग करण्याचा पूर्ण अधिकार आहे. एखाद्याला बळजबरीने मुस्लिम धर्मात ठेवण्याचा कायदा आमच्याकडे नाही. तसेच भारताबाबत मुस्लिमांच्या प्रेमाचे म्हणाल तर, आमच्या पूर्वजांनी जिन्ना आणि पाकिस्तानला नकारले होते, हे लक्षात ठेवावे असे सलीस म्हणाले. भारत आमचा देश असून घटनेवर आमचा विश्वास असल्याचे ते म्हणाले.

बंद खोलीत उत्तर दिले नाही तर, परिषदेत काय देणार ?
सलीस यांच्या मते 90 मिनिटांच्या या चर्चेचा सार केवळ एवढा होता की, इंद्रेश यांनी आम्हाला मुस्लिमांचे संमेलन बोलावण्यास सांगितले आणि त्यात उत्तर देऊ असे म्टले. पण जर त्यांनी आम्हाला बंद खोलीत याचे उत्तर दिले नाही, तर संमेलनात काय देणार? मुस्लिम या प्रश्नांनी हैराण असल्याने उत्तरे जाणून घेण्यासाठी आम्ही आलो होतो. धर्म ही आमची खासगी बाब आहे. हा देशाचा मुद्दा नाही. आम्ही तर एमआयएमच्या असदुद्दीन यांच्या वक्तव्यांशीही सहमत नाही आहोत. धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा देश कधीही आदर करू शकत नाही. हा देश गांधीजींच्या सिद्धांतांवर चालतो ओवेसींच्या नाही, असेही ते म्हणाले.