आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview: आमचा मुद्दा विकासाचा, हिदुंसाठी काम करण्यात गैर काय- उमा भारती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमा भारती म्हणाल्या, सपा-बसपाने राज्यात सत्ता उपभोगताना भ्रष्टाचार आणि घोटाळे करत राज्याला किमान 25 वर्षे मागे लोटले आहे. (फाइल) - Divya Marathi
उमा भारती म्हणाल्या, सपा-बसपाने राज्यात सत्ता उपभोगताना भ्रष्टाचार आणि घोटाळे करत राज्याला किमान 25 वर्षे मागे लोटले आहे. (फाइल)
लखनौ (उत्तर प्रदेश) - काँग्रेसबरोबर हातमिळवणी करुन अखिलेश यादव यांनी मोठी चूक केली आहे. असे केले नसते तर ते किमान दुसऱ्या क्रमांकावर तरी राहिले असते, अशी भावना केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केली आहे.
 
उत्तर प्रदेश उध्वस्त करणाऱ्या लोकांना आम्ही सोडणार नाही, अशा शब्दांत उमा भारतींनी हल्ला चढवला आहे. मायावती आणि समाजवादी पार्टीने तरुणांची स्वप्ने उध्वस्त केली आहे. हिंदुंसाठी काम करण्यात काही चुकीचे नाही. भाजपची केवळ एक भूमिका असून ती विकासाची असल्याचे उमा भारती यांनी स्पष्ट केले. DainikBhaskar.comचे प्रतिनिधी दिनेश मिश्रा यांनी घेतलेल्या मुलाखतीत भारती यांनी विविध विषयांवर मते स्पष्ट केली. 

Q: भाजपच्या नेत्यांना उत्तर प्रदेशातच सर्व काही चुकीचे दिसते यामागचे कारण काय? एमपी, छत्तीसगड अशा राज्यांतही कुपोषण आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे?
A: उत्तर प्रदेशात गेल्या 15 वर्षांत केवळ लुटीचे राजकारण झाले आहे. सपा-बसपाने एका पाठोपाठ एक राज्यात भ्रष्टाचार आणि घोटाळे करत राज्याला 25 वर्षे मागे ढकलले आहे. एमपीमध्ये असलेल्या बुंदेलखंडातील शेतकरी आनंदी आहे. तर उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडातील दुरावस्थेमुळे येथील लोक सरकारवर नाराज आहेत. एमपीमध्ये कुपोषण आहे पण ते उत्तर प्रदेशातील तुलनेत ते फार कमी आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत आकडे लपवून कुपोषण दूर केले जात नाही. युपीमध्ये मात्र अधिकारीच आकडे लपवतात. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत गुन्हे दाखल करून गुन्हेगारांवर नजर ठेवली जाते. तर युपीमध्ये तक्रार करणाऱ्यालाच तुरुंगात पाठवले जाते. 

Q: विकासाचे सर्व मुद्दे निवडणुकांपुरतेच असतात का? उत्तर प्रदेशसाठी केंद्राने काय केले?
A: यंदाच्या बजेटमध्ये खूप काही आहे. याच्या बळावर राज्यात सधनता येऊ सकेल. सर्वात मोठी अडचण म्हणजे केंद्रे एखादे धोरण आखून जो पैसा पाठवते त्यावर राज्य सरकार अंमलबजावणी करत नाही. जनतेचा पैसा आपल्याच मालकीचा आहे, असे सपा-बसपाच्या नेत्यांना वाटते. मायावतींनी लुटालूट करताना सर्व सीमा ओलांडल्या तर अखिलेश यादव यांनी मुलायम सिंह अँड कंपनीच्या मदतीने जनतेला ठगले. 

Q: 2014 च्या प्रचारादरम्यान वारंवार असे म्हटले जात होते की, बुलेट ट्रेन धावेल, रेल्वेचा वेग वाढेल, पण गेल्या 3 वर्षांत या दिशेने काय काम झाले?
A: मोदींनी दिलेली सर्व वचने पूर्ण होत आहेत. बुलेट ट्रेनबाबत बैठकांमध्ये चर्चा सुरू आहे. लवकरच ते सर्वांसमोर येईल. भाजप सरकारने 3 वर्षांत जे काम केले आहे, त्याचा 60 वर्ष घोटाळे करणाऱ्या काँग्रेसने कधी विचारही केला नव्हता. 

Q: भाजपचे मंत्री म्हणतात आमचे वादळ आहे, तुमचे मत काय आहे?
A: पंतप्रधान मोदींची लाट ही सर्व वादळांपेक्षा वेगात आहे. विरोधकांना समजण्याआधीच उत्तरप्रदेशच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदानात ही लाट सुनामी बनून समोर येईल. 

Q: युपीत सर्व केंद्रीय मंत्री हिंदुंविषयी बोलतात. पंतप्रधान म्हणतात आम्ही विकासाचे राजकारण करतो. अशा वक्तव्यामुळे ध्रुवीकरण होण्याची शक्यता असते का?
A: हिंदुंबाबत बोलण्यात चुकीचे काहीही नाही. आम्ही एखादे धोरण ठरवताना हिंदु किंवा एखाद्या दुसऱ्या धर्माचा विचार करत नाही. पंतप्रधानांनी प्रत्येक घरात गॅस पोहोचवण्याचा विचार केला तेव्हा कोणत्याही धर्माची विचारणा केली नाही. भाजपची केवळ विकासाची भूमिका आहे. आम्ही हिंदुंसाठी काम करतो याबाबत कोणाला आक्षेप असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. 

Q: अनेक वर्षांपासून तुम्ही नमामी गंगेचे काम करत आहात, मंत्रीही आहात तरीही गंगा अजून स्वच्छ का झाली नाही?
A: आतापर्यंतच्या काँग्रेसच्या सरकारमधील नेत्यांचे मनच स्वच्छ नव्हते. गंगेच्या स्वच्छतेसाठी जे अभियान चालवायला हवे होते, त्याचा ज्याप्रकारे आढावा घ्यायला हवा होता ते होऊ शकले नाही, गंगेला केवळ नदी समजून स्वच्छतेच्या आड जो घोटाळा आणि पैशाची उधळपट्टी झाली. त्यामुळे गंगा स्वच्छतेचे अभियान पूर्ण होऊ शकले नाही. गंगेच्या स्वच्छतेसाठी आम्ही जे काम केले ते फार गंभीरपणे केले आहे. यावेळी गंगा स्वच्छ होईल किंवा माझा मृत्यू तरी होईल. 

Q: गंगेच्या स्वच्छतेसाठी जे धोरण ठरते ते राबवण्याआधीच दुसरे धोरण येते, नेमकी काय अडचण आहे?
A: आतापर्यंत अनेक सरकारांनी प्लॅन तयार केले. पण जेव्हा त्याच्या सुपरव्हिजनचा मुद्दा येतो तेव्हा सर्व काही अपयशी ठरते. गंगेच्या स्वच्छतेसाठी वेगळ्या बजेटशिवाय कामाचे सुपरव्हिजन हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर आता लक्ष केंद्रीत केले आहे. स्वच्छ केलेले पाणी दुसऱ्या कामासाठी वापरून सॉलीड वेस्ट बाहेर काढण्याकडेही लक्ष देण्यात आले आहे. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर प्रश्नांवर काय म्हणाल्या उमा भारती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...