आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्टर-अॅक्ट्रेसेसची चूक नाही, पद्मावती वादासाठी लेखकच जबाबदार : उमा भारती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पद्मावती चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादावर केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी यावेळी चित्रपटात काम करत असलेल्या अॅक्टर आणि अॅक्ट्रेसेसचा बचाव केला आहे. त्यांनी गुरुवारी म्हटले की, विरोध करताना महिलांच्या सन्मानाचा विचार करायला हवा. तसेच वादासाठी स्क्रिप्ट रायटर आणि डायरेक्टर जबाबदार असल्याचेही म्हटले आहे. उमा भारती यांनी काही दिवसांपूर्वी चित्रपटाबाबत खुले पत्रही लिहिले होते. संजय लीला भंसाळी यांच्या या चित्रपटाचा विरोध मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि कर्नाटक सारख्या राज्यांपर्यंत पोहोचला आहे. राजपूत करनी सेनेनेतर दीपिका पदुकोणचे नाक कापण्याची धमकीही दिली आहे. 


उमा भारतींनी केले ट्वीट...
- उमा भारती यांनी पद्मावतीबाबत ट्वीट केले. त्यांनी लिहिले, आपण पद्मावतीच्या सन्मानाबाबत बोलणार असून तर आपण महिलांच्या सन्मानाची काळजीही घ्यायला हवी. पद्मावती किंवा त्यात काम करणाऱ्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यांबाबत बोलणे योग्य नाही. त्यांच्यावर टीका करणेही योग्य नाही. 
- उमा भारतींनी लिहिले, पद्मावती चित्रपटाचे दिग्दर्शक आणि त्यांचे सहकारी म्हणून स्क्रिप्ट रायटर हेच कथेसाठी जबाबदार आहेत. लिखाण करताना त्यांनीच लोकांच्या भावनांची काळजी घ्यायला हवी होती. 
- आक्षेप असलेल्या गोष्टींचा सेंसॉर बोर्ड विचार करेल असे मला सांगण्यात आले आहे. सेंसॉर ही स्वतंत्र संस्था असून सर्वांच्या भावना लक्षात घेऊनच चित्रपटाला सर्टिफिकेट दिले जाईल अशी अपेक्षा आहे. 


असा सुरू झाला होता वाद..
- राजपूत करनी सेनाने याचा विरोध केला होता. त्याची सुरुवात राजस्थानमध्ये शुटिंगच्यावेळी झाली होती. या चित्रपटात पद्मापती आणि खिलजी यांच्यात इंटिमेट सीन दाखवल्याने त्यांच्या भावना दुखावल्या जातील असे करनी सेनेचे मत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून विरोध होत आहे. करनी सेनेने अनेक ठिकाणी आंदोलन करून पुतळ्यांचे दहनही केले आहे. 
- गुजरात बीजेपीने म्हटले की, चित्रपटात क्षत्रिय समाजाच्या भावनांना ठेस पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिलीजपूर्वी हा चित्रपट राजपूत प्रतिनिधींना दाखवायला हवा. त्यामुळे रिलीजच्या वेळी तणाव टाळता येईल. 


दिग्दर्शकाची भूमिका.. 
- 'पद्मावती'ला विरोध झाल्यानंतर डायरेक्टर संजय लीला भंसाळी म्हणाले होते की, या चित्रपटात विरोध करण्यासारखे काहीही नाही. 
- नुकतीच एका कलाकाराने पद्मावतीची रांगोळी काढली होती ती रांगोळीही काही लोकांनी मोडली. त्यानंतर पद्मावतीची भूमिका करणाऱ्या दीपिका पदुकोनने ब्रॉडकास्टींग मिनिस्टर स्मृती ईराणीला टॅग करत, अशा घटनांवर कारवाई व्हावी असे म्हटले होते. 


उमा भारतींनी लिहिले होते खुले पत्र.. 
- उमा भारती यांनी या विषयावर खुले पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, तथ्य बदलता येत नाहीत. ते चांगले किंवा वाईट असे भाष्य करता येते. विचाराचे स्वातंत्र्य म्हणजे, आपल्या निंदा किंवा स्तुतीचा अधिकार असतो. पण ऐतिहासिक विषयावर चित्रपट तयार करताना फॅक्ट बदलता येत नसतात. 
- राणी पद्मावतीची गाथा ऐतिहासिक तथ्य आहे. अलाउद्दीन खिलजी व्याभीचारी हल्लेखोर होता. राणी पद्मावतीवर त्याची वाईट दृष्टी होती. त्याने चित्तोड उध्वस्त केले होते. 
- पद्मावती यांचे पती राणा रतन सिंह सहकाऱ्यांसह शहीद झाले होते. पद्मावतीने स्वतः हजारो महिलांसह आगीत उडी मारत जोहर पत्कारले होते. आम्ही हाच इतिहास वाचला आहे. त्यामुळेच आजही त्यांच्यासाठी सन्मान आणि खिलजीच्या नावावर चीड येते. 
- आजही काही मुले प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मुलींवर अॅसिड फेकतात, ते कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे असले तरी ते मला अलाउद्दीन खिलजीचे वंशज वाटतात. 

 

बातम्या आणखी आहेत...