आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UN Day Of Indigenous People, Life Of Tribals In 1700 Feet Down From Earth

12 वर्षांपूर्वी जमिनीखाली 1700 फूट खोलवर सापडली होती ही आदिवासी वस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - 9 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. मध्य प्रदेश हे एक आदिवासी बहुल राज्य आहे. पश्चिम मध्य प्रदेशात झाबुआपासून पूर्वेला मंडला-डिंडोरीपर्यंत मोठ्या संख्येत आदिवासी आढळतात. विशेष म्हणजे मध्य प्रदेशात एक अशी आदिवासी वस्ती आहे, ज्याठिकाणी मानवाला तर सोडाच पण सूर्यकिरणांनाही मोठ्या प्रयत्नांनंतर पोहोचता येते. ही आदिवासी वस्ती जमिनीच्या 1700 फूट खोलीवर आहे. अवघ्या 12 वर्षांपूर्वी याठिकाणी मानवी वस्ती असल्याचा शोध लागला होता.

भोपाळपासून अवघ्या 300 किमी अंतरावर असलेल्या ठिकाणाला पाताळकोट म्हटले जाते. छिंडवाडा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगेत ही वस्ती आहे. रावणाचा सर्वात मोठा मुलगा मेघनाद शंकरराचू पूजा करून याच पाताळात गेला होता, अशी अख्यायिका आहे. या पाताळकोटमधील १२ गावांत भारिया आणि गाेंड आदिवासी राहतात. शंकरालाच ते दैवत मानतात. यापैकी दोन तीन गावे तर अशी आहेत, जेथे आजही कोणाला जाता येत नाही. जमीनीपासून एक हाजर फुटांपेक्षा अधिक खोलवर असल्याने येथील अनेक गावांत सूर्य अगदी डोक्यावर आल्यावर म्हणजे बाराच्या सुमारास येथे सूर्यप्रकाश पोहोचतो. काही गावांमध्ये तर सूर्यप्रकाशच पोहोचत नाही, त्यामुळे तेथे कधीच सकाळच होत नाही, असेही म्हटले जाते. हे आदिवासी महूची शेती करतात आणि जंगलातील फळे आणि कंद हे त्यांचे मुख्य भोजन आहे.

काही वर्षांपूर्वी लागला शोध
१२ वर्षांपूर्वी या वस्तीचा शोध लागल्याचे म्हटले जाते. पावसाळ्यात सातपुड्याचे पर्वत ढगांनी वेढलेले असतात. त्यावेळी अनेक पर्यंटक येथे पर्यटनासाठी येत असतात. पण पाताळकोटमध्ये जाण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागले. येथे २० गावे होती पण नैसर्गिक संकटामुळे केवळ १२ गावेच याठिकाणी शिल्लक राहीली असे सांगितले जाते.

तिसऱ्या जगात पोहोचण्याचे पाच रस्ते
पाताळकोटला जाण्यासाठी पाच मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने गेले तरी खोल दरीत सुमारे पाच किलोमीटरपर्यंत तुम्हाला पायी चालावे लागते. एवढ्या परिश्रमानंतर तुम्ही जेव्हा याठिकाणी पोहोचला तेव्हा लक्षात येते की, हे ठिकाणही स्वर्गापेक्षा काही कमी नाही. झगमगाटापासून दूर असलेल्या या गावात पोहोचतात तिसऱ्या जगात पोहोचल्याची जाणीव होते. येथे जवळपास नेहमीच धुके असते. पाताळकोटमद्ये रातेड, कारेआम, नचमटीपूर, दूधी आणि गायनी नदीचे उगम स्थान तसेच राजाखोह ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.

इंग्रजांपासून येथे लपला होता नागपूरचा राजा
पाताळकोटमझ्ये एका मोठ्या टेकडीखाली 100 फूट लांब आणि 25 फूट रूंद गुहा आहे. नागपूरचे तत्कालीन राजे रघुजी यांनी इंग्रजांच्या विरोधात बंड केला होता. पण जेव्हा त्यांना इंग्रजांपासून दोका निर्माण झाला तेव्हा ते याच गुहेत लपून बसले होते, असे सांगितले जाते. तेव्हापासून या गुहेला राजाखोह नाव पडले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पाताळकोटच्या आदिवासी जीवनाचे काही PHOTOS