आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राम रहीम अन् हनीप्रीतला संयुक्त राष्ट्राकडून आमंत्रण, वर्ल्ड टॉयलेट डे निमित्त मागितला पाठिंबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहीम आणि हनीप्रीतला वर्ल्ड टॉयलेट डेच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्राकडून भाषणासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. - Divya Marathi
राम रहीम आणि हनीप्रीतला वर्ल्ड टॉयलेट डेच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्राकडून भाषणासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.
नवी दिल्ली-  बलात्काराच्या आरोपात 20 वर्षांची कैद भोगणाऱ्या बलात्कारी राम रहीमला संयुक्त राष्ट्राने वर्ल्ड टॉयलेट डेच्या निमित्ताने भाषण देण्यासाठी आमंत्रण दिले आहे. संयुक्त राष्ट्राकडून हनीप्रीतलाही निमंत्रण देण्यात आले आहे. वर्ल्ड टॉयलेट डे 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. 
- तत्पूर्वी, मंगळवारीच हनीप्रीतला पोलिसांनी अटक केली आहे.
- संयुक्त राष्ट्राकडून स्वच्छ पाणी आणि शौचालयासाठी काम करणाऱ्या एका संघटनेने बुधवारी सकाळी ट्विट केले की डिअर, हनीप्रीत आणि गुरमित राम रहीम आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही वर्ल्ड टॉयलेट डेच्या निमित्ताने तुमचे म्हणणे मांडाल.
- 39 दिवसांपासून फरार हनीप्रीतला मंगळवारी पोलिसांनी अटक केली होती. पोलिस बुधवारी हनीप्रीतला  कोर्टात हजर करून कोठडीची मागणी करतील.
पोलिसांच्या कस्टडीत हनीप्रीतची तब्येत बिघडली आहे. पंचकुलाच्या चंडी मंदिरात पोलिस स्टेशनमध्ये बंद हनीप्रीतच्या छातीत दुखत असल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. रात्रीच तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.
-एकेकाळी कॅमेऱ्यासमोर अॅक्शन करणारी हनीप्रीत आता मीडियापासून दूर पळत होती. तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले, पण तिचा एकच धोशा होता- मी निर्दोष आहे.
 
पुढच्या स्लाइडवर पाहा, संयुक्त राष्ट्राकडून करण्यात आलेले ट्विट...
बातम्या आणखी आहेत...