आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unable To Pay Debts Man Allegedly Let Brother Rape His Wife

कर्जबाजारी पतीने भाऊ आणि मित्राच्या स्वाधिन केली पत्नी; नराधमांनी लुटली अब्रु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिवानी- हरियाणातील भिवानी जिल्ह्यात एका कर्जबाजारी पतीने त्याच्या पत्नीला मोठा भाऊ आणि मित्राच्या स्वाधिन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्ही नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अनेकदा बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्‍यात आला असून दोन्ही आरोपी फरार आहेत.

मिळालेली माहिती अशी की, 29 वर्षीय पीडिता दिल्लीतील दर्यापूर येथील रहिवासी आहे. तिचा विवाह चरखी दादरी भागात राहाणार्‍या संजयसोबत झाला होता. संजयने त्याचा मोठा भाऊ विजय आणि मित्र हरकेशकडून 25 हजार रुपये कर्ज घेतले होते. परंतु, संजयला दिलेल्या मुदतीत रुपये परत करता आले नाही. त्या बदल्यात संजयने त्याच्या पत्नीला विजय आणि हरकेशच्या स्वाधिन केले. दोघांनी तिच्यावर अनेक दिवस बलात्कार करून आपले रुपये वसूल केले.

पीडितेने सांगितली 'आपबिती'
पती संजयने त्याचा मोठा भाऊ विजय आणि हरकेश याच्याकडून 25 हजार रुपये घेतले होते. परंतु, त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. संजयने आरोपींकडून घेतलेले रुपये मुदतीत परत केले असते. तर आपल्यावर ही वेळ आली नसती, असेही पीडितेने सांगितले.

दोन्ही आरोपी संजयला रुपये मागण्यासाठी वारंवार घरी यायचे. अखेर संजयने रुपये देण्यास हात वर करून पत्नीला अक्षरश: त्यांच्या स्वाधिन केले. पत्नीला घरी एकटीच सोडून तो काकाच्या घरी निघुन जायचा. नंतर दोन्ही अारोपी घरी यायचे आणि आळीपाळीने बलात्कार करून निघून जायचे. परंतु, हा प्रकार दररोजचा झाल्याने तिने नातेवाईकांना सगळा प्रकार सांगितला. पीडितेवर दिल्लीतील तुलाराम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडितेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

पीडितेला गुंगीचे इंजेक्शन द्यायचे नराधम...
नराधमांच्या जाचाला कंटाळून संजयच्या पत्नीने विरोध केला होता. परंतु, दोन्ही आरोपी पीडितेच्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबत. तिला पलंगाला बांधून तिच्यावर बलात्कार करत. इतकेच नव्हे तर दोन्ही नराधम तिला गुंगी येण्याचे इंजेक्शनही देत असल्याची माहिती वैद्यकीय तपासणीत समोर आली आहे.