आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unauthorized IAS Officer Leave In Derhadun Hostel Till 6 Month

मसुरी अकादमीत राहिली ६ महिने तोतया आयएएस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देहरादून - एका महिलेने आयएएस अधिकारी असल्याचे भासवून उत्तराखंडच्या मसुरी शहरातील प्रतिष्ठित लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीत बिनघोरपणे तब्बल सहा महिने मुक्काम केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरी सेवेत निवड झालेल्या उमेदवारांना येथे प्रशिक्षण दिले जाते. ही संस्था अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे.
विशेष म्हणजे या महिलेने २७ मार्चला अकादमी सोडल्याच्या काही दिवसांनंतर ही घटना उजेडात आली. प्रशासकीय अधिकारी सत्यवीर सिंह यांनी मंगळवारी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानुसार यूपीतील मुजफ्फरनगरहून आलेल्या या महिलेने २० सप्टेंबर रोजी रुबी सिंह या नावाने स्वत:ची ओळख देऊन आपण प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ मुक्काम केल्यानंतर ती २७ मार्चपासून अचानक गायब झाली. अत्यंत कडेकोट सुरक्षेच्या या संस्थेत तिला प्रवेश कसा मिळाला, याची कसून चौकशी केली जात आहे.