आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार अॅक्सिडेंटः अंडर-19 क्रिकेट टीमच्या कर्णधाराला जमावाकडून बेदम मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटनाच्या कंकड़बाग पोलिस स्टेशनमध्ये ईशान. - Divya Marathi
पाटनाच्या कंकड़बाग पोलिस स्टेशनमध्ये ईशान.
पाटना- अंडर-19 क्रिकेट संघाचा कर्णधार ईशान किशन याला एका कार अॅक्सिडेंटनंतर संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. त्याची कार एका रिक्षाला धडकली. यात 4 जण जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांनी क्रिकेटर ईशानला पोलिस स्टेशनमध्ये नेऊन सोडून दिले. मात्र कार ईशान चालवत होता की त्याचे वडिल हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

कसा झाला अपघात... काय केले जमावाने...
झाले असे की, अंडर-19 क्रिकेट संघाचा कर्णधार ईशान किशन हा मंगळवारी सायंकाळी कंकडबाग रिक्षा स्टॅन्डच्या रस्त्याहून जात होता. दरम्यान त्याची कार एका रिक्षाला धडकली. या अपघातात रिक्षातील 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये रिक्षा ड्रायव्हर आणि एका महिलेचाही समावेश आहे. इशांतची कार वेगात होती आणि एका वळणावर समोरून येत असलेल्या रिक्षावर ती आदळली असा आरोप करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संतप्त जमावाने मारहाण करून ईशानचे कपडेही फाडले होते.
काय आहेत पोलीसांवर आरोप...
- घटनेनंतर तत्काळ घटनास्थळी पोहोचलेले पोलिस ईशान आणि त्याच्या वडिलांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले.
- पोलिसांवर आरोप करण्यात आला आहे की, फिर्यादिने लेखी तक्रार केल्यानंतर पोलीसांनी गुन्ह्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
- तीन तास ईशान कंकडबाग पोलिस स्टेशनमध्ये होता. साधारणपणे रात्री आठ वाजता त्याला आणि त्याच्या वडिलांना सोडण्यात आले.
ईशानने केला चेहरा लपवण्याचा प्रयत्न
- अंडर-19 क्रिकेट संघाचा कर्णधार पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्याचे वृत्त हवेसारखे पसरले. हे वृत्त कळताच पत्रकार मंडळीही तत्काळ पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.
- कॅमेरा पाहताच ईशान चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता.
- ईशान पोलिस स्टेशनमध्ये पोहोचताच तेथील सुरक्षा वाढवण्यात आली.
कोण आहे इशान
- ईशान पाटनाचा रहिवासी असून, तो यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे.
- अंडर-19 विश्वचषक 22 जानेवारीपासून बांगलादेश येथे सुरू होत आहे. यासाठी कर्णधार ईशानकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS...