आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Under Shadow Of Violence, Afghans Vote In Landmark Election News In Divya Marathi

अफगाण निवडणुकीत बोगस मतदानाच्या 1900 तक्रारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल - अफगाणिस्तानातील नुकत्याच झालेल्या मतदान प्रक्रियेत प्रचंड बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तक्रारींची संख्या 1900 च्या आसपास आहे. तुलनेने मात्र गेल्या निवडणुकीपेक्षा हे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात आले.

निवडणूक आयुक्त मोहंमद नादीर मोहसेनी यांनी ही माहिती दिली. प्रत्येक तक्रारीची खातरजमा करण्यात येईल. त्यानंतरच 5 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करता येऊ शकेल, असे मोहसेनी यांनी स्पष्ट केले. रविवारी उशिरा आणि त्यानंतर 24 एप्रिलला निकालाचे चित्र जाहीर होणार आहे.