आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये भाजप फुटीच्या उंबरठय़ावर, असंतोष शिगेला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - आगामी लोकसभा निवडणुकीला जोरकसपणे सामोरे जाण्याची तयारी एकीकडे भाजप करत असताना दुसरीकडे पक्षांतर्गत हेवेदावे, फाटाफूट आणि बेदिली उफाळून आली आहे. संयुक्त जनता दलाने भाजपपासून काडीमोड घेतल्यानंतर भाजपमध्ये धुमसत असलेला असंतोष विकोपाला गेला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार भाजपमधील बंडखोरांना फूस देत असल्याचा आरोप पक्षर्शेष्ठींनी केला आहे. बिहार भाजप प्रमुख सुशीलकुमार मोदी यांच्याविरुद्ध जवळपास 12 आमदारांनी मोहीम उघडली आहे. भाजपच्या एका आमदाराला पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.

सुशीलकुमार मोदी, सरचिटणीस व राज्य प्रभारी धर्मेंद्र प्रधान, विरोधी पक्षनेते नंदकिशोर यादव, प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे आणि अन्य काही नेत्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा केली. बैठकीत सहभागी नेत्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र बैठकीत राजकीय विषयावर चर्चा होतच असते, असे सांगत वरिष्ठ भाजप नेते गिरिराज सिंग यांनी सद्य:स्थितीवरील उपायांबाबतचे संकेत दिले. भागवत यांचा हा पहिला बिहार दौरा आहे. नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदास भागवत यांनी सर्मथन दिले होते. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सी. पी. ठाकूर, सरचिटणीस राधा सिंग आणि माजी मंत्री चंद्रमोहन राय आदी नेते बैठकीस उपस्थित होते.


चौहानांच्या पोस्टरवरून मोदी गायब
मध्य प्रदेशातील महाकाल येथून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेवेळी लावण्यात आलेल्या पोस्टरवरून गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या प्रचार समितीचे अध्यक्ष नरेंद्र मोदींचे छायाचत्रि गायब झाल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. लालकृष्ण अडवाणी हेच भाजपचे सर्वोच्च नेते असल्याचे चौहान यांनी म्हटल्यामुळे त्यात भरच पडली आहे. मध्य प्रदेश भाजप कार्यालयाच्या वतीने हे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवरून मोदींच्या जवळ असलेल्या सर्वच नेत्यांना वगळण्यात आले आहे.


तिकीट विक्रीसाठी खास खिडकी
गुजरातचे मुख्यमंत्री व आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांच्या हैदराबाद येथे 11 ऑगस्ट रोजी होणार्‍या जाहीर सभेच्या तिकीट विक्रीसाठी भाजपने खास तिकीट खिडकी सुरू केली आहे. या सभेला उपस्थित राहू इच्छिणार्‍यांनी प्रत्येकी पाच रुपये भरावेत, असे भाजपकडून सांगण्यात आले. या सभेसाठी ऑनलाइन नावनोंदणी मागील आठवड्यातच सुरू झाली. आता तिकीट विक्रीसाठी खिडकी सुरू करून ऑफलाइन नोंदणी सुरू केली आहे. या निमित्ताने पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या मोदी यांची लोकप्रियता सिद्ध करण्याचाही उद्देश आहे.


चौहानांच्या पोस्टरवरून मोदी गायब
मध्य प्रदेशातील महाकाल येथून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेवेळी लावण्यात आलेल्या पोस्टरवरून गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या प्रचार समितीचे अध्यक्ष नरेंद्र मोदींचे छायाचत्रि गायब झाल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. लालकृष्ण अडवाणी हेच भाजपचे सर्वोच्च नेते असल्याचे चौहान यांनी म्हटल्यामुळे त्यात भरच पडली आहे. मध्य प्रदेश भाजप कार्यालयाच्या वतीने हे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवरून मोदींच्या जवळ असलेल्या सर्वच नेत्यांना वगळण्यात आले आहे.


नेमका वाद काय
माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी पक्ष हायज्ॉक केल्याचा आरोप करत काही आमदारांनी त्यांच्या नेतृत्वास उघड विरोध केला आहे. दरभंगा जिल्ह्यातील हयाघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमरनाथ गामी यांना सहा वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले. आपल्यासोबत 12 आमदार असल्याचा दावा गामी यांनी केला आहे. भाजपने मात्र त्याचा इन्कार केला आहे.


जदयूसोबत टी 20 सामना : मोदी
जदयूने आमच्या आमदारांची विकेट घेतल्याचा दावा केला आहे. त्यांच्यासोबतचा हा टी 20 सामना आहे. आम्ही जदयूच्या दुप्पट विकेट घेऊ, असा इशारा मोदी यांनी दिला आहे. तत्त्वासाठी सर्व काही सोडल्याचा व्यक्तीचा दावा पोकळ आहे. विधान परिषदेच्या रिक्त 12 जागांसाठीचा निधी वापरला जात असल्याचा आरोप मोदी यांनी नितीशकुमार यांचे नाव न घेता केला.