आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा केंद्रापासून दर 3 किमीवर तैनात असतो कॉपी माफियाचा माणूस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/औरंगाबाद/जयपूर/भिंड - मुजफ्फरनगरमध्ये लष्कराने परीक्षार्थींना जमिनीवर केवळ अंडरवेअरवर बसवून परीक्षा घेतल्याचे दृश्य आठवत असेल. बिहारमध्ये मुलांना उत्तीर्ण करण्यासाठी नातेवाईक खिडक्यांवर चढून कसे कॉप्या पुरवत होते हेही आठवत असेल. ही केवळ दोन दृश्ये नव्हेत, देशभरातील परीक्षा पद्धतीचे हेच वास्तव आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे एआयपीएमटी -२०१५ मध्ये ६.३० लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देणे भाग पडले. यासाठी सीबीएसईला जवळपास ८० कोटी रुपये खर्च करावे लागले होते. यानंतर परीक्षेसाठी ड्रेसकोडही ठरवण्यात आला. मुली कर्णफुले घालू शकत नाहीत, तर मुले पूर्ण बाहीचे शर्ट घालू शकत नाहीत. गेल्या वर्षभरात देशात डझनभर परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. याचे गड भलेही उत्तर प्रदेश आणि बिहार असतील; मात्र त्याची मुळे देशभर रुजली आहेत. या गुन्ह्यात माफियापासून शिकलेले बेरोजगार, शिक्षक आणि सरकारी कर्मचारी सहभागी आहेत.

औरंगाबादमधील एका खासगी शाळेतील शिक्षक अभिलाष (बदललेले नाव) म्हणाले, गावांत मुलांना कॉप्या करू न दिल्यास मुले उत्तीर्ण होत नाहीत. वरून चांगला निकाल लावण्याचाही दबाव असतो. मार्च-ऑक्टोबरमध्ये परीक्षेचा मोसम असतो तेव्हा वार्षिक वेतनासमान पैशाची आवक होते. परीक्षेच्या दिवशी एक प्रश्नपत्रिका त्या विषयाच्या जाणकाराकडे दिली जाते. तो सर्वात आधी बहुपर्यायी प्रश्नांना खूण करून विद्यार्थ्यांकडे साेपवतो. सर्व विद्यार्थ्यांनी एकाच विषयावर निबंध लिहू नये याची काळजी घेतली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या निबंधांच्या कॉप्या पुरवल्या जातात. ज्या विद्यार्थ्याला जास्त गुण हवे असतील त्याच्याकडून त्याप्रमाणात पैसे घेतले जातात. या विद्यार्थ्यांना कॉप्या लिहिण्यासाठी जास्त वेळ दिला जातो. हरियाणा शिक्षक पात्रता परीक्षेबाबत म्हणाल तर यामध्ये ४० कोटी रुपयांचा व्यवहार समोर आला होता. नोव्हेंबर २०१५ मध्ये परीक्षेच्या दिवशी लेव्हल - ३ ची उत्तरे फुटली होती. सरकारी कार्यालयापासून परीक्षा केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवताना मधल्या सव्वा तासात प्रश्नपत्रिका फुटली. तो सोडवला गेला आणि आधीपासूनच तयार २०० खरेदीदारांना चांदणी चौक नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करण्यात आला. प्रत्येक खरेदीदाराचा २ लाखांत सौदा झाला. म्हणजे एकूण व्यवहार ४० कोटी रुपयांचा. पेपर फोडणाऱ्यांमध्ये शिक्षक आणि सरकारी कर्मचारीच निघाले.

एक चांगले पाऊल : गुजरातमध्ये या वर्षी महसूल लेखा परीक्षेच्या काळात सकाळी ९.०० ते १.०० वाजेपर्यंत मोबाइल, इंटरनेट बंद होते. २०१५ मध्ये याच परीक्षेचा पेपर फुटला होता.

पुढील स्लाईडवर क्लिक करून वाचा, जाळे विणण्याची आणखी एक कहाणी...

कंटेंट : पाटणामधून राजरतन कमल, भिंडमधून आकाश सिंह भदौरिया, औरंगाबादमधून दत्ता सांगळे , जयपुरमधून विनोद मित्तल
बातम्या आणखी आहेत...