आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षातून 50वेळा काश्मीरला यावे लागले तरी येणार, खोऱ्यातील परिस्थिती सुधारत आहे - राजनाथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - गृहमंत्री राजनाथसिंह चार दिवसांच्या काश्मिर दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, गरज पडली तर वर्षातून 50वेळा काश्मीरला येईल. राजनाथ सिंहांनी काश्मीर समस्या सोडवण्यासाठी '4सी' चा पर्याय दिला आहे. गृहमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, कम्पॅशन (द्या), कम्यूनिकेशन (संवाद), को-एग्जिस्टन्स (सोबत राहाणे) आणि कॉन्फिडन्स बिल्डिंग अँड कन्स्टिटन्सी (कायम विश्वास ठेवणे) या तत्त्वावर ही समस्या सोडवता येऊ शकते. राजनाथ सिंहांनी परिस्थितीचा आढावा घेतला. काँग्रेसचेही एक शिष्टमंडळ येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहे. 
काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारत आहे...
- राजनाथसिंह म्हणाले, 'मला वाटते की काश्मीरमध्ये पूर्वीपेक्षा सध्या परिस्थिती चांगली आहे. मी हा दावा नाही करत की सर्वकाही ठिक आहे. मात्र एवढं नक्की आहे की वेगाने परिस्थिती बदलत आहे.' 
- सरकार फुटिरतावाद्यांशी चर्चा करणार का, यावर गृहमंत्री म्हणाले, 'जे आमची मदत करु इच्छितात त्या सर्वांना भेटण्याची मला इच्छा आहे. त्यासाठी औपचारिक निमंत्रण देण्याची गरज मला वाटत नाही. ज्यांना चर्चा करायची आहे त्यांनी पुढे आले पाहिजे.'
- आर्टिकल 35A बद्दल राजनाथ म्हणाले, की आम्हाला जनतेच्या भावना दुखवायच्या नाही. या मुद्द्यावर ना सरकार काही करणार आहे ना कोर्टात जाणार आहे. 

नौशेरात काय म्हणाले राजनाथ 
- 'सीजफायर व्हायलेशनमध्ये जे जवान 50% अपंग झाले आहे त्यांना 5 लाख रुपये मदत दिली जाईल. त्यासोबतच सरकार या हल्ल्यांमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना दिल्या जाणाऱ्या मदतनिधीत वाढ करत आहे. ही मदत एक लाखांऐवजी आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे.'
- 'मी अधिकाऱ्यांना म्हटले आहे की काश्मीर सीमेवरील नागरिकांची 60% भरती करा. जे लोक सीमेवर राहातात ते देशाची सर्वात मोठी स्ट्रॅटिजीक संपत्ती असतात.'
- 'भारत आता कमकुवत देश नाही तर जगातील शक्तीशाली देश बनला आहे.'
बातम्या आणखी आहेत...