आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Home Minister Rajnath Singh In Marathi News

विविध मुद्दे सोडवण्याची भारताची प्रामाणिक इच्छा - राजनाथ सिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- चीनसोबतचा सीमा प्रश्न सोडवण्याची भारताची प्रामाणिक इच्छा आहे. या संदर्भातील मतभेद दूर करण्यासाठी चीननेही पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. भारत-चीन सीमेबाबत वैचारिक मतभेद आहेत. चीन ही सीमा असल्याचे सांगतो तेव्हा आम्ही करत या ठिकाणापासून सीमा सुरू होत असल्याचे सांगतो. अशा स्थितीत सीमारेषेचा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी चीनने पुढे आले पाहिजे. भारताला सर्व वादावर शांततेच्या मार्गाने तोडगा हवा आहे, असे राजनाथ सिंह यांनी आयटीबीपीच्या बटालियन कॅम्पचे उद्घाटन केल्यानंतर सांगितले.
आयटीबीपीसाठी 35 चौक्या : भारताचीक्षेत्रीय विस्ताराची कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. मात्र, सीमा प्रश्नावरील वैचारिक मतभेद दूर करण्याची आपल्या सरकारची इच्छा आहे, असे सिंह म्हणाले. आम्ही विस्तारवादी नाहीत हा भारताचा इतिहास सांगतो. आम्ही शांततेचे पूजक आहोत. त्यामुळे सर्व मुद्दे प्रामाणिकपणे सोडवण्याची आमची इच्छा आहे, असे सिंह यांनी स्पष्ट केले.
जम्मूतील सीमा नाक्यावर पाककडून गोळीबार
जम्मू सीमेनजीकच्या सीमा नाक्यावर पाकिस्तानी रेंजर्सने गोळीबार करत बुधवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू जिल्ह्यातील अरनिया सेक्टरमधील नाक्यावर गोळीबार झाल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) अधिकाऱ्याने दिली. यानंतर बीएसएफच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल पहाटे ३.०० वाजता गोळीबार केला. गेल्या आठवड्यात पाकिस्तानी रेंजर्सने सहापेक्षा जास्त वेळेस शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
माजीतालिबान कमांडर इसिसचा अफ-पाक प्रमुख
कुख्यातदहशतवादी संघटना आयएसआयएसने अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतातील काही भागाच्या प्रमुखपदी माजी तालिबान कमांडरची नेमणूक केली आहे. आयएसने प्रसारित केलेल्या ऑनलाइन व्हिडिओमध्ये आयएसचा कमांडर अबु मुहंमद अल-अदनीने खुरसन भागाचा माजी तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचा कमांडर हाफिज सईद खानला प्रमुख केल्याचे म्हटले आहे.