आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Home Minister Rajnath Singh\'s Chopper Has Diluted

नक्षल प्रभावित भागात भरकटले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे हेलिकॉप्टर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह)
रांची- झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेसाठी बुधवारी रांचीत आलेले गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे हेलिकॉप्टर नक्षल प्रभावित भागात भरकटल्याची घटना घडली. राजनाथ यांचे हेलिकॉप्टर नक्षल प्रभावित भागात जवळपास आठ मिनिटे घिरटया घेत होते एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून (एटीसी) सिग्नल न मिळाल्यामुळे राजनाथ सिंह यांच्यावर हा प्रसंग ओढवल्याची माहिती मिळाली आहे.

एटीसीकडून सिग्नल न मिळाल्याने वैमानिकाने प्रसंगावधान राखून हेलिकॉप्टर एका सुरक्षित स्थळी उतरवले. नंतर एटीसीकडून सिग्नल मिळाल्यानंतर हेलिकॉप्टर सुखरुप रांची एअरपोर्टवर पोहोचले. वैमानिकाने हेलिकॉप्टरला माझगाव भागात उतरवले होते. या प्रकारामुळे राजनाथ सिंह यांची एक नियोजित जाहीर सभा ऐनवेळी रद्द करण्‍यात आल्याची माहिती सूत्रांन‍ी दिली.
राजनाथ सिंह सिंहभूम जिल्ह्यातील बडाजामदा येथील जाहीर सभेत संबोधित करणार होते. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टरला जवळपास 8 मिनिटे एटीसीने कोणताही सिग्नल दिला नाही. वैमानिकाने एटीसीला संपर्क साधन्याचा खूप प्रयत्न केला. अखेर त्याने रांची एअरपोर्टला अलर्ट दिल्याचे अधिकार्‍यांची चांगलीच धांडली उडाली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, जमशेदपूरमधील पोटका येथील जाहीर सभेत काय म्हणाले राजनाथ सिंह