गाझियाबाद - अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला विदेशातून मिळालेल्या निधीची गृह मंत्रालयाकडून तपासणी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपच्या बँक खात्यांचा ताळेबंद तपासला जाईल. गृह खात्याच्या अधिका-याने ही माहिती दिली असून, हायकोर्टाच्या आदेशानंतर काही मुद्द्यांवर ‘आप’च्या नेत्यांचे स्पष्टीकरण मागवले जाईल. ‘आप’च्या मते, अनेक एनएनआरआयसह 63 हजार भारतीयांनी 19 कोटी निधी पक्षासाठी जमवला होता.
दरम्यान, केजरीवाल शनिवारी रामलीला मैदानावर दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तब्येत ठीक नसल्याने येऊ शकणार नसल्याचे कळवले आहे, असे केजरीवाल म्हणाले.
माझ्याकडे जादूची कांडी नाही : सर्व समस्या एका झटक्यात सोडवण्यासाठी माझ्याकडे जादूची कांडी नाही. पण सर्व अशक्यही नाही. प्रामाणिक अधिकारी सोबत आले तर खूप काही करू शकू. असे अधिकारी व कर्मचा-यांनी एसएमएस, इ-मेलद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.