आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरमधील दहशतवाद आता शेवटच्या टप्प्यात; सुरक्षा दलांना दिलेल्या मोकळिकीचा परिणाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद आता शेवटच्या टप्प्यात आहे. तीन दशकांपासून सुरू असलेले दहशतवादाचे थैमान संपवण्यासाठी केंद्र सरकारने सुरक्षा दलांना मोकळीक दिली. त्यामुळेच दहशतवादविरोधी मोहिमांना सतत यश मिळत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी केले.  


बांदीपुरा येथे शनिवारी झालेल्या चकमकीत सहा पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले होते. त्यात मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी-उर रहमान लखवीच्या पुतण्याचाही समावेश होता. त्याबाबत विचारले असता सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने उचललेल्या निर्णायक पावलांचा हा परिणाम आहे. सुरक्षा दलांना कारवाई करण्यास मोकळीक दिल्यामुळेच सतत असे यश मिळत आहे. राज्यातील दहशतवादाचा हा शेवटचा टप्पा आहे, असे मी म्हणत आहे. पण काही लोक हे वक्तव्य गांभीर्याने घेतच नाहीत. दहशतवादी कमांडरची आयुष्य मर्यादा आता १० ते १५ आठवडे एवढीच उरली आहे. एका कमांडरची नियुक्ती झाली की लगेच दुसऱ्यालाही तयार ठेवले जात आहे. अनेक वर्षे दहशतवादी कमांडर राहण्याचा काळ आता संपला आहे. आमचे सरकार स्पष्ट धोरण, निर्धार आणि सातत्य या निकषांवर काम करत आहे. सुरक्षा दलांच्या कामात आम्ही हस्तक्षेप करत नाही. असे प्रथमच घडत आहे, असा उल्लेख करून सिंह म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष कारवाई गटानेही चांगली कामगिरी केली आहे. 

 

काश्मीरमध्ये पहिला हल्ला केला : इसिस
काश्मीरमध्ये पहिला दहशतवादी हल्ला केल्याचा दावा इसिस या दहशतवादी संघटनेने केला आहे. काश्मीरमधील जाकुरात शुक्रवारी पोलिसांवर आम्हीच हल्ला केला, असे इसिसच्या अमाक या प्रपोगंडा संस्थेने म्हटले आहे. केंद्र सरकारने हा दावा गांभीर्याने घेतला आहे. पीएमओतील राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, गृह मंत्रालय आणि सुरक्षा संस्था या दिशेने योग्य पावले उचलत आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक एस. पी. वेद म्हणाले की, या दाव्याची पुष्टी होणे आवश्यक आहे. राज्यात इसिसचे अस्तित्व आहे, असे वाटत नाही.

बातम्या आणखी आहेत...