आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Minister Uma Bharati Helicopter Issue In Ranchi News In Marathi

उमा भारती बालंबाल बचावल्या, नक्षली भागात भरकटले हेलिकॉप्टर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- दोन तासांनंतर लॅंडिग झाल्यानंतर हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती)

रांची- केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांचे हेलिकॉप्टर शनिवारी झारखंडमधील नक्षली भागात भरकटले. उमा भारती रांचीहून रजरप्पा येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर वाट चुकले आणि जंगलावरच घिरट्या घालत होते. तब्बल तासभरानंतर उमा भारती यांचे हेलिकॉप्टर सुरक्षित ठिकाणी उतरले. उमा भारती सुखरूप आहेत. झारखंडमधील बोकारो हा जिल्हा नक्षल प्रभावित समजला जातो.

खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला सिग्नल मिळाला नाही. त्यामुळे ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. हेलिकॉप्टरमधील इंधनही संपण्याच्या मार्गावर होते. नंतर उमा भारती यांच्या निर्देशावरून हेलिकॉप्टर पुन्हा रांचीला आले. इंधन भरल्यानंतर पुन्हा रजरप्पासाठी रवाना करण्यात आले.

उमा भारती या शनिवार रजरप्पा मंदिरात पूजा करण्‍यासाठी निघाल्या होत्या. मात्र, हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर आकाशातच घिरट्या घालत होते. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची एकच धांदल उडाली.

रांचीपासून जवळ असलेल्या रामगड जिल्ह्यात ही घटना घडली. रजरप्पा मंदिर नक्षल प्रभावीत‍ भागात आहे. उभा भारती सुखरुप असून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

यापूर्वी संथाल परगना भागात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे हेलिकॉप्टर भरकटले होते.


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, हेलिकॉप्टरला लोकेशन दाखवण्यासाठी जाळण्यात आले टायर...