आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय राज्यमंत्री विजय सापलांची राधेमाँसोबतची छायाचित्रे व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होशियारपूर - वादग्रस्त व स्वयंघोषित अाध्यात्मिक गुरू राधेमाँ वादात अडकल्याने त्यांच्यावर सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यातच केंद्रीय राज्यमंत्री विजय सांपला हे कुटुंबीयांसमवेत राधेमाँची पूजा करत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. हे छायाचित्र राधेमाँ यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून घेण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार ही छायाचित्रे िवजय सांपला यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थान ८ मूर्ती लेन येथील आहेत. १७ जून रोजी राधेमाँ यांनी या सरकारी निवासस्थानी सत्संग कार्यक्रम घेतला होता. त्या वेळी सांपला कुटुंबीय तेथे हजर होते.

यासंदर्भात सांपला यांच्याकडून स्पष्टीकरण मिळू शकले नाही.