आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसोक्त खेळा, वेळ मिळाला तर करा अभ्यास, पाल्यांसाठी सुरू केली अफलातून शाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदरा - चिखलात मनसोक्त खेळणारी आणि झाडावर चढून गप्पा मारणारी मुले या शाळेत दिसतात. कधी ही मुले तलावात डुंबण्याची मौज करतात तर कधी पोळ्या बनवतानाही दिसतात. वडोद-याच्या गोत्री परिसरातील हे दृश्य. या शाळेत वजनदार दप्तरे नाहीत, कोणती सक्ती नाही. पण कमालीची शिस्त पाहण्यास मिळते.

शहरातील ७ पालकांनी मिळून ही शाळा उभारली. यात अनिवासी भारतीय सॉफ्टवेअर विकासक, डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक अशा पालकांचा समावेश आहे. मुलांना सामाजिक भान देण्यासाठी त्यांनी हा प्रयोग केला आहे. वर्गात, प्रात्यक्षिकांसह व विविध उपक्रमांतून या मुलांना शिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे येथे शिक्षकाची भूमिका हे पालकच निभावतात.

जीवनासाठी उपयुक्त शिक्षण मुलांना दिले जात असल्याचा दावा या पालकांनी केला. खेळून कंटाळा आल्यावर मुलांना येथे अभ्यास करावा लागतो. ताेसुद्धा त्यांच्या आवडत्या विषयाचा. सर्व पालक विविध विषयांत तज्ज्ञ आहेत. त्यामुळे हे होम-स्कूल सुरू केले. स्वत: पाल्यांना शिकवण्याचे ठरवले. येथे पुस्तकांचे आेझे नाही, अत्याधुनिक इमारतही नाही. या शाळेची स्वच्छताही मुले स्वत: करतात. खेळत खेळत शिकण्याची ही संकल्पना २ वर्षांपूर्वी प्रत्यक्षात आली. सॉफ्टवेअर अभियंता दिव्यांग कापडिया सांगतात , ‘मोठ-मोठ्या शाळेत शिक्षण होते. मात्र मुले पुस्तकी किडे होतात. आमची मुले जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी असावीत, असे मला वाटते. क्रमिक पुस्तकांशिवाय इतर पुस्तकांतूनही आम्ही मुलांना शिकवतो. ’

यासाठी विशेष
- प्रात्यक्षिकांतून अभ्यास. ८.३० ते दुपारी १.३० पर्यंत.
- सर्व पालक नियोजनाप्रमाणे १ दिवस शिकवतात.
- गावांत, जंगलात, तलावाकाठी भरतात वर्ग
- परीक्षा घेतली जात नाही. दिवाळी व उन्हाळ्यात प्रत्येकी १ महिना सुट्या. पालक मिळून निर्णय घेतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS