आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घोड्यावरून आला चोर, पैसे-दागिने नाही तर चोरी केले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर- घरात आणि दुकानात घुसून दागिने आणि पैसे चोरणाऱ्या चोरांचे किस्से तर तुम्ही ऐकलेच असतील, परंतु गोरखपूर येथे एक चोर असा आहे, जो रात्र होताच घोड्यावर सवार होऊन बल्ब चोरी करण्यास निघाला. त्याने एकदाच दोन दूकानांसमोरील बल्ब चोरी केले आणि त्यानंतर फरार झाला. त्याची ही चोरी तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. 


घोड्यावर बसून आला चोर...
- प्रकरण झंगहा क्षेत्रातील आहे. येथील एका दुकानाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात चौराची चोरी कैद झाली आहे.
- दुकाणदाराने सांगितले की, 24 नोव्हेंबरच्या रात्री दुकान बंद करून घरी निघून गेलो. सकाळी जेव्हा परतलो, तेव्हा माझ्या आणि माझ्या समोरली दुकानासमोरचे बल्ब गायब झालेले होते. 
- शॉपच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर एक पाढऱ्या रंगाचा घोड्यावर बसून एक तरूण येताना दिसला. इकडे तिकडे पाहिल्यानंतर तो घोड्यावरच उभा राहिला आणि दोन्ही दुकानासमोरील बल्ब काढून तेथून फरार झाला.
- सध्या पोलिसाकडे या प्रकरणाची कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

 

पुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...