आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unique Wedding: Two Feet Groom Gets His Match After 28 Year

VIDEO :दोन फुटांचा नवरदेव, तीन फुटांची नवरी; 28 वर्षांची प्रतीक्षा संपली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍या पत्‍नीसोबत प्रमोद. - Divya Marathi
आपल्‍या पत्‍नीसोबत प्रमोद.
इलाहाबाद (उत्‍तर प्रदेश) - तो 47 वर्षांचा. त्‍याची उंची अवघी दोन फूट (2.46 इंच). ती 33 वर्षांची. नुकतेच हे जोडपे विवाहबंधनात अडकले असून, तिची उंची तीन फूट (3.49) इतकीच. त्‍यांना आशीर्वाद आणि शुभेच्‍छा द्यायला आप्‍त स्‍वयकीयांनी गर्दी केली होती. (पाचव्‍या स्‍लाइइडवर पाहा VIDEO )
28 वर्षांची प्रतीक्षा संपली...
इलाहाबादपासून 80 किलोमीटर दूर असलेल्‍या गींज या गावातील प्रमोद याची उंची कमी असल्‍याने तो कायम थट्टेचा विषय बनला होता. तो 19 वर्षांचा असताना त्‍याच्‍या कुटुंबीयांनी त्‍याच्‍यासाठी मुली पाहायला सुरुवात केली; परंतु, प्रमोद याला आपल्‍यासारख्‍याच उंचीच्‍या मुलीसोबत लग्‍न करायचे होते. त्‍यामुळे आतापर्यंत त्‍याचे लग्‍न होऊ शकले नाही. त्‍या नंतर प्रमोदनेही हट्ट सोडला. परिणामी, 28 वर्षांनंतर 33 वर्षीय पूनम त्‍याला मिळाली.
भाजी विक्रेत्‍यांनी दिली पूनम विषयी माहिती...
एका महिन्‍यापूर्वी एका भाजी विक्रेत्‍याने प्रमोद याच्‍या कुटुंबीयांना पूनम विषयी माहिती दिली. कमी उंची असल्‍यामुळे तिच्‍याही लग्‍नाला अडथळा येत होता. नंतर दोन्‍ही कुटुंबीयांनी एकमेकांची भेट घेतली आणि लग्‍न निश्चित केले.
लग्‍न झाल्‍यानंतर काय म्‍हणाला प्रमोद...
प्रमोद म्‍हणाला, 'मला माझ्याच उंचीची मुलगी पत्‍नी म्‍हणून हवी होती. परंतु, शोध घेऊनही तशी कुणी सापडली नाही. आपलेही कधी लग्‍न होईल, ही आशाच मी सोडून दिली होती. अखेर देवाच्‍या कृपेने मला पूनम मिळाली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज... आणि पाचव्‍या स्‍लाइइडवर पाहा VIDEO