आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेवारस पार्थिवावर स्वखर्चातून होतो अंत्यसंस्कार, १५ वर्षांत दीडशेवर विधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोपालगंज - आयएएस,आयपीएस स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे वर्ग घेणारा ३५ वर्षांचा तरुण नवीन रंजन सनदी सेवेत दाखल होण्याआधीच विद्यार्थ्यांना लोकसेवेच्या कामाचा अनोखा धडा देत आहे. नवीनने आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त बेवारस पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले आहेत. नवीन माणिकपूर या आपल्या गावी मृतदेह आपल्या कारमध्ये वाहत आणतो स्वत:च्या खासगी जमिनीत अंत्यसंस्कार करतो. गेल्या १५ वर्षांपासून ही सेवा सुरू आहे.
आता पोलिस, प्रशासन, रुग्णालय, रेल्वेस्थानक आणि अन्य संस्था बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नवीनला कळवतात. विशेष म्हणजे हे सर्व काम स्वखर्चाने केले जात आहे.
कुंभमेळ्यात बुडालेल्या भावाचे पार्थिव शोधताना बेवारस मृतदेह सापडल्याच्या घटनेपासून नवीनच्या समाजकार्याला सुरुवात झाली. नवीन म्हणाला, २००१ मध्ये अलाहाबादमध्ये यूपीएससीची तयारी करत होतो. माझा मावस भाऊ रितेश तिथेच पदवी कोर्स करत होता. १४ जानेवारी २००१ रोजी तो प्रयागच्या कुंभमेळ्यात स्नानासाठी गेला आणि बुडाला. त्याला शोधताना अनेक वाहते मृतदेह दिसले. त्या प्रत्येक मृतदेहामध्ये मला माझा भाऊ दिसला. त्यामुळे बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे तेव्हाच ठरवले.

कुटुंबाचीही मदत मिळते
नवीनलाया कामात पत्नी शिल्पीही मदत करते. आई सुशीलाचेही पाठबळ आहे. पार्थिवाला खांदा देण्यासाठी आता त्यांचे मित्र विकास सिंह, साेनूची साथ मिळत आहे. कोणाची मदत मिळाल्यास नवीन एकटेच अंत्यसंस्कार करतात. गोपालगंजमध्ये राहणाऱ्या नवीन यांना बेवारस मृतदेहांची माहिती दिली जाते.
बातम्या आणखी आहेत...