आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरात कुशल गृहिणी आहे खासदार डिंपल यादव, घोडेस्वारीचीही आवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी आणि कन्नौज लोकसभा मतदार संघाच्या खासदार डिंपल यादव यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. बिनविरोध निवडून आलेल्या त्या देशातील पहिल्या खासदार आहेत. महाराष्ट्राशी त्यांचे जवळचे नाते आहे. महाराष्टातील विद्येचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणा-या पुण्यात 1978 मध्ये त्यांचा जन्म झाला. डिंपल यांचे वडील कर्नल एस.सी रावत यांची तेव्हा पुण्याला पोस्टींग होती.

डिंपल यांचे शिक्षण पुणे, भटिंडा, अंदमान-निकोबार बेट आणि लखनौ येथे झाले आहे. लखनौ विद्यापीठातून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. येथेच अखिलेश यादव यांच्यासोबत त्यांची ओळख झाली. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात केव्हा झाले हे त्यांनाही कळले नाही.

अखिलेश यांनी त्यानंतर मरीन इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर त्यांनी लग्न केले. लग्नानंतर डिंपल गृहीणी झाल्या तर अखिलेश यांनी समाजवादी पक्षामधून राजकारणात प्रवेश केला.