आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unrest In Ranchi Against 'Love Jihad', Police Lathicharge On Hindu Activists

PHOTOS : 'लव्ह जिहाद' विरोधी हिंसक आंदोलन करणा-यांवर लाठी चार्ज, अनेक अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - आंदोलन थांबवण्यासार्थी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करणारे पोलिस कर्मचारी

रांची - हिंदु असल्याची फसवणूक करून राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेव हिच्याशी विवाह करून तिला धर्मांतर करण्यासाठी बळजबरी करण्याच्या विरोधात विहिंप आणि इतर हिंदु संघटनांनी पुकारलेला बंद चांगलाच परिणामकारक ठरला आहे.
शहरातील मुख्य रस्त्यासह बहुतांश परिसरातील दुकाने बंद आहेत. रस्त्यावर वाहने किंचितच दिसत आहेत. आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या विहिंप, बजरंग दल आणि नारी सेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांना अनेक ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला. तसेच अनेक कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे. लाठीचार्जमुळे काही कार्यकर्त्यांना गंभीर दुखापतही झाली आहे. अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना कॅम्प जेल जयपाल सिंह स्टेडीयममध्ये आणण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

कार्यकर्त्यांनी केली तोडफोड
शहरात कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलन सुरू केल्याचे चित्र आहे. ते ठिकठिकाणी तोडफोड करत आहेत. लालपूर चौक, बरियातू रोड, पुरुलिया रोड, बूटी मोडसह अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना वाहनांचे नुकसान, तोडफोड केली आहे. अनेक ठिकाणी रिक्षांच्या काचा फोडून चालकांना धमकावण्यातही आले.

सीआरपीएफ-पोलिसांत वाद
फिरायालाल चौकात सीआरपीएफ आणि पोलिस अधिका-यांमध्ये वाद झाले. नारी सेनेच्या अटक केलेल्या कार्यकर्त्यांना सीआरपीएफच्या महिला बटालीयनबरोबर पाठवावे असे पोलिस अधिका-यांना वाटत होते. पण सीआरपीएफचे अधिकारी त्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे त्यांच्यात वाद झाले.

पुढील स्लाइड्सवर पाहा आंदोलनाचे काही PHOTO...
फोटो - सोहन सिंह/पवन कुमार