पानीपतमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी होत असून, संपूर्ण पानीपत खो-यात जणू काही बर्फाची शुभ्र चादर पांघरल्याचा आभास निर्माण होत आहे. हिरयाणात सर्वचठिकाणी बर्फवृष्टी होत असून महेंद्रगढ आणि भिवानीच्या चरखी दादरी क्षेत्रात एक फुटा पेक्षा जास्त बर्फ साचल्यामुळे ट्रेक्टरच्या मदतीने रस्त्यावरचा बर्फ काढला जात आहे.
या बर्फवृष्टीमुळे हजारो एकर पिकांचे नुकसान झाले आहे. महेंद्रगड, सेहलंग, अगिहार, बुवाना, खेडी-तलवाना, बसई गावातमध्ये एक फुटापेक्षा जास्त बर्फ साचल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
बर्फवृष्टी की गारपीट ?
अंबालासारख्या सखल भागात बर्फवृष्टी झाल्यामुळे पर्यावरण तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांमध्ये हा संशोधनाचा विषय ठरला आहे. कँट गवर्नमेंट कॉलेजमधील भूगोल विषयाचे प्रध्यापक डॉ. सुरेश देसवाल म्हणाले की या क्षेत्रामध्ये बर्फवृष्टी होत नाही. हा गारपीटचा प्रकार असला पाहिजे असा अंदाज त्यांनी बांधला आहे.
पुढील स्लाईडवर पाहा या बर्फवृष्टीचे फोटो...