आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारचे दोन माजी मुख्यमंत्री, लालू आणि राबडी देवी, पाहा काही Unseen Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लालू प्रसाद यादव पत्नी राबडी देवी आणि कुटुंबीयांसह. - Divya Marathi
लालू प्रसाद यादव पत्नी राबडी देवी आणि कुटुंबीयांसह.
पटना - एक भारतीय नेते जे कधी लोकांना त्यांच्या बोलण्यामुळे खळखळून हसवतात तर कघी लगेचच शांत बसण्यासाठी झिडकारतातही. पण त्यावरही लोक हसतानाच दिसतात. त्याचे कारण म्हणजे त्यांचा अंदाजच काही असा आहे. लोक त्याचा चांगलाच आनंद घेतात. ही नेते दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव हे आहेत. चारा घोटाळा प्रकरणी त्यांना 5 वर्षे तुरुंगवास आणि 25 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

खासगी जीवनाबाबत...
लालू यांचा जन्म बिहारच्या गोपालगंज जिल्ह्याच्या फुलवरिया गावात 11 जून 1948 रोजी झाला होता. लालू यांचे वडील शेतकरी होते. पण मुलाचे स्वप्न शेतकरी बनण्याचे नव्हते. विद्यार्थी दशेत असताना 1974 मधील आंदोलन हे लालूप्रसाद यादव यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला. जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या या आंदोलनात नितीश कुमार आणि लालू यादव तरुणांचे नेते म्हणून समोर आले. अवघ्या 29 व्या वर्षी लालूप्रसाद यादव खासदार बनले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, लालू यादव यांचे काही PHOTOS...