आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बसपा, भाजपचा सभात्याग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशच्या विधानसभेत गुरुवारी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरील चर्चेत विरोधकांनी सभात्याग केला. बसपा आणि भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला. सरकारकडून नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईवरील स्पष्टीकरणावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. राज्याने ७ हजार ५०० कोटींची मागणी केली होती. परंतु केंद्राने केवळ २ हजार ८०१ कोटींची मदत दिली आहे, असे महसूल मंत्री शिवपाल यादव यांनी सांगताच भाजपच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेत सभागृह सोडले.