आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत बांगलादेशच्या संशयित दहशतवाद्याला अटक, बनावट पासपोर्ट काढून राहत होता - एटीएस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या 6 वर्षांपासून तो बनावट पासपोर्टवर भारतात राहत होता. - Divya Marathi
गेल्या 6 वर्षांपासून तो बनावट पासपोर्टवर भारतात राहत होता.
लखनऊ - उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रविवारी बांगलादेशच्या एका संशयित दहशतवाद्याला रविवारी अटक केली. एटीएसचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बृजेश श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव अब्दुल्ला आहे. तो गेल्या 6 वर्षांपासून बनावट पासपोर्टवर देवबंद, सहारनपूर आणि मुजफ्फरनगरसह शामली या शहरांमध्ये राहत होता.
 
दहशतवाद्यांना देत होता आश्रय
- यूपी एटीएसचे महासंचालक असीम अरुण यांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला बनावट डोमेसाइल सर्टिफिकेट (निवासी प्रमाणपत्र), बनावट पासपोर्ट तयार करून भारतात राहत होता. तो दहशतवाद्यांना आश्रय देत होता. तसेच त्यांची ओळखपत्रे आणि इतर कागदपत्रे सुद्धा तयार करत होता.
- सध्या तो मुजफ्फरनगरच्या कुटेसरा येथे एका महिन्यापासून राहत होता. त्यापूर्वी सहारनपूर आणि 2011 मध्ये तो देवबंद येथे राहत होता. याच ठिकाणी त्याने स्वतःचा आधार आणि पासपोर्ट बनवला.
बातम्या आणखी आहेत...