आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलायम यांच्या पुतण्यावर आरोप, आमदाराची गच्छंती; मुख्यमंत्र्यांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बदायूंचे आमदार आबिद रजा यांना पक्ष तसेच विधानसभेतून निलंबित केले आहे. पक्षशिस्तीचा भंग व पक्षविरोधी कारवायांचा आरोप ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

रजा यांनी एक दिवसअगोदर सपा नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे सूर लावले होते. बदायूंचे सपा खासदार तसेच मुलायमसिंह यांचे पुतणे धर्मेंद्र यादव यांच्यावर नाव न घेता अवैध उत्खनन, भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप केले होते. विधानसभेत या नेत्याचे नाव जाहीर करण्यात येईल, अशी धमकीदेखील त्यांनी दिली होती. सपाच्या मोठ्या नेत्याकडून जीविताला धोका असल्याचा आरोपही रजा यांनी केला होता. जिवाला धोका असल्याची माहिती देऊनही पोलिसांनी अजून तपास सुरू केला नाही, असा दावा रजा यांनी केला. सपाप्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले, बदायूं शाखेच्या शिफारसीनंतर अखिलेश यांनी कारवाई केली आहे. दरम्यान, विधान परिषदेत विरोधी मतदान केल्याच्या प्रकरणात ४ जून रोजी पक्षाने चार आमदारांना निलंबित केले होते.

तिकीट कपातीचा अंदाज, विरोधकांच्या संपर्कात
२०१७ मधील निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता धूसर झाल्यामुळे रजा विरोधी पक्षांच्या संपर्कात होते. पत्रकार परिषदेतही त्यांनी सपा सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यांनी पत्रकारांसमोर पक्षाच्या नेत्यांवर आरोप केले.
बातम्या आणखी आहेत...