आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • UP Chief Minister Yogi Adityanath Celebrate Diwali In Ayodhya Today: Deepotsav On Saryu Ghasts As It Happens Updates

1.71 लाख दिव्यांच्या प्रकाशात अयोध्येत दिवाळी झाली साजरी; 5 हजार विद्यार्थी दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अयोध्या - अयोध्येत प्रथमच मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी,  त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, राज्यपाल राम नाईक, महेश शर्मा व के. जे. अल्फान्स आदींनी  बुधवारी एक दिवस आधीच दिवाळी साजरी केली. ज्या हेलिकॉप्टरमधून योगी दाखल झाले, त्यातूनच श्रीरामचंद्र, सीता व लक्ष्मणांच्या वेशभूषेतील कलावंताना रामकथा पार्कमध्ये आणण्यात आले.  तेथे योगी यांनी या कलाकारांचे कुंकुमतिलक लावून  स्वागत केले. ढोलताशे, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि “जय श्रीराम’च्या जयघोषात रामजन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या  ११ देखाव्यांची मिरवणूक आरंभ झाली. रामकथा पार्कमध्ये श्रीरामाच्या मूर्तीवर राज्याभिषेक करण्यात आला. शरयू नदीच्या “रामाच्या पॅडी’ वर १ लाख ७१ हजारांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने दिवे उजळवण्याचा हा विश्वविक्रम असल्याचा दावा केला जात आहे.  
 
बाबरी अॅक्शन कमिटीचा आक्षेप
याआधी २३ सप्टेंबर २०१६ रोजी रामरहीमच्या सिरसा येथील एका कार्यक्रमात दीड लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले होते.  या ठिकाणी थायलंड व इंडोनेशियाहून आलेल्या कलावंतांनी रामलीला सादर केली.  मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी १३७ कोटी रुपयांच्या योजनांचा शिलान्यास केला.  बाबरी मशिद अॅक्शन कमिटीने अयोध्येत सरकारी खर्चाने दिवाळी साजरी करण्यावर आक्षेप घेतला आहे.  

ज्या अयोध्येने दिवाळी सण दिला, तीच उपेक्षित का? :  योगी  
योगी आदित्यनाथ म्हणाले, अयोध्या नगरपालिकेची (अयोध्या व फैजाबाद) लोकसंख्या १ लाख ७१ हजार आहे. यामुळे तेवढे दिवे लावण्यात आले.  ज्या अयोध्येने जगाला दिवाळी हा सण दिला त्यावरच प्रश्नचिन्ह लावले जाते.. का? ती उपेक्षित का राहिली?  आमचे नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे  जाणारे अभियान आहे. चार टप्प्यांच्या कार्यक्रमानुसार आजचा राज्याभिषेक सोहळा आणि दीपोत्सव हा पहिला टप्पा आहे. आमचे शासन चेहरे व धर्म पाहून भेदभाव करत नाही, हेच रामराज्य आहे. याआधीचे रावण राज्य होते, असा टोला त्यांनी लगावला.  

मूळ समस्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी  अयोध्येत सोहळा साजरा केला, हा विराेधकांनी केलेला आक्षेप मुख्यमंत्री योगी यांनी फेटाळून लावला. अयोध्येत विकास योजना राबवण्यासाठीच येथे  आलो आहोत, असे ते म्हणाले.  यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
या सोहळ्याच्या आयोजनामागील उद्देश
-  ही भाजपच्या २०१९ च्या निवडणुकांच्या तयारीची सुरुवात समजली जात आहे.  
-  भाजप राम मंदिराच्या मुद्द्यावर ठाम आहे, हे भासवण्याचा हा प्रयत्न आहे.  
-  अयोध्येची बाबरी पाडण्याच्या प्रसिद्धीपासून  दूर करून रामाच्या नावास प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न  
-  उत्तर प्रदेशात पर्यटनाचे केंद्र बनवण्याचे प्रयत्न
 
बातम्या आणखी आहेत...