आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: SP-BSP आघाडीची वायफळ चर्चा, असे काही होणार नाही -अखिलेश यादव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान सुरु आहे. 11 मार्च रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर समाजवादी पक्ष आणि मायावतींचा बहुजन समाज पक्षाची आघाडी होऊन इतिहासाची पुररावृत्ती होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यावर अखिलेश यांनी अशी कोणतीही आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. DainikBhaskar.com ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले, '11 मार्चनंतर गरज पडली तरी कोणत्याही आघाडीचा विचार नाही.'  
मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी खासदार डिंपल यांनी प्रिंट किंवा ऑनलाइन मीडियाला एकत्रित मुलाखत देण्याची ही पहिली वेळ आहे. यादव दाम्पत्याने सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. या मुलाखतीचा संपादीत भाग Divyamarathi.com च्या वाचकांसाठी...
 
Q. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी 1993 मध्ये सपा आणि बसपा एकत्र आले होते. 11 मार्चनंतर गरज पडल्यास इतिहासाची पुनरावृत्ती पाहायला मिळेल ? बसपा, किंवा रालोद किंवा इतर कोणाला सोबत घेऊन सपा आघाडीचे सरकार स्थापन करणार ? 
A. आम्ही पूर्ण बहुमताने विजयी होणार. त्यामुळे असा काही विचारही करत नाही. 11 तारखेनंतर काय होईल हे आताच सांगणे योग्य होणार नाही. तरीही जर तशी काही गरज निर्माणही झाली तरी आम्ही आघाडीचा विचार करत नाही. 
 
Q. तुमच्या मंत्रिमंडळातील गायत्री प्रजापती यांच्यावर सामूहिक बलात्काराचा आरोप आहे. सुप्रीम कोर्टानेही त्यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. तरीही अजून ते मंत्रिमंडळात का आहे ?
A. सुप्रीम कोर्टाच्या आदेशवर कारवाई केली जात आहे. पोलिस प्रशासन आणि सरकार पूर्ण सहकार्य करत आहे. आमचे तर म्हणणे आहे की प्रजापती जेथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर समोर यावे. कोर्टासमोर आपली बाजू मांडावी आणि कायदेशीर कारवाईला सामारे जावे.

Q. माझा प्रश्न आहे की त्यांना अजूनही मंत्रिमंडळात का ठेवले आहे. राज्यपाल राम नाईक यांनीही तुम्हाला पत्र पाठवून हेच विचारले ? 
A. आम्ही त्यांना मंत्रिमंडळातून काढलेले नाही. मात्र आमचे म्हणणे आहे की त्यांनी स्वतः कोर्टासमोर हजर व्हावे आणि आत्मसमर्पण करावे. सरकार पूर्ण सहकार्य करत आहे. या प्रकरणाच्या दुसऱ्या बाजूवर मी काहीही बोलत नाही. प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही. मीडियाने या प्रकरणाचा छडा नक्की लावावा. 
 
Q. काही दिवसांपूर्वीच अमरसिंहांनी म्हटले होते की मुलायम सिंह यादव कुटुंबातील भांडण हे प्री-प्लॅन होते. त्यात अमरसिंहांचा वापर झाला. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ? 
A. मी यावर काहीच बोलणार नाही... फक्त एवढेच सांगतो अंकलने नेहमी खरे बोलले पाहिजे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...