आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीळा आणि टोपीत भेदभाव करणार नाही; युपीत सगळेच सुरक्षित, मी हमी देतो: योगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- माझे सरकार टीळा आणि टोपीत भेदभाव करणार नाही. उत्‍तरप्रदेशमध्‍ये सर्व सुरक्षित आहेत, याची मी हमी देतो, असे म्‍हणत उत्‍तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी राज्‍यातील अल्‍पसंख्‍याकांना आश्‍वस्‍त करण्‍याचा प्रयत्‍न केला. शुक्रवारी पत्रकारांशी त्‍यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 
 
असे का म्हणाले योगी? 
- योगी आदित्‍यनाथ मुख्‍यमंत्री बनल्‍यापासून उत्‍तरप्रदेशमध्‍ये अल्‍पसंख्‍याकांविरोधात घटना वाढत आहे, या टीकेला योगी आदित्‍यनाथ यांनी उत्‍तर दिले. 
- बुलंदशहरमध्‍ये हिंदू युवा वाहिनी संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी एका मुस्लिम युवकाला मारहाण केल्‍याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. 
- तसेच भाजप व बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍यांनीही काही दिवसांपूर्वी सहारनपूर आणि आग्रा येथे पोलिसांना मारहाण केली होती. यावेळी एक खासदार आणि एक पोलिस अधिकारी जखमी झाला होता. त्‍यामुळे उत्‍तरप्रदेशात कट्टरतावादी हिंदू संघटनांचा उच्‍छाद वाढत असताना योगी सरकार जाणीवपूर्वक अशा घटनांकडे दुर्लक्ष करत आहे व या संघटनांना पाठीशी घालत आहे, अशी टीका योगी आदित्‍यनाथ यांच्‍यावर केली जात आहे. 
- या संघटना खुलेआम कायदा हातात घेत असताना योगी सरकार याविरोधात कठोर कारवाई का करत नाही? असा प्रश्‍न योगी आदित्‍यनाथ यांना यावेळी पत्रकारांनी विचारला.  
- यावर उत्‍तर देताना योगी म्हणाले, 'बुलंदशहराची घटना ही वैयक्तिक वादातून घडलेला प्रकार आहे. असे या प्रकरणातील पीडितांनीही मान्‍य केले आहे. आमचे सरकार कोणाविरोधातही भेदभाव करणार नाही. उत्‍तरप्रदेशात सर्व सुरक्षित आहेत, याची मी हमी देतो. उत्‍तर प्रदेशात फक्‍त आणि फक्‍त कायद्याचेच राज्‍य असेल.' 

हिंदु युवा वाहिनीच्‍या कार्यकर्त्‍यांना योगींनी खडसावले
- योगी मुख्‍यमंत्री बनल्‍यानंतर उत्‍तरप्रदेशमध्‍ये हिंदु युवा वाहिनीचे कार्यकर्ते तसेच स्‍वयंघोषित गोरक्षक अनेक ठिकाणी गुंडगिरी करत असल्‍याचे आढळून आले आहे.  
- याची दखल घेत योगी आदित्‍यनाथ यांनी संघटनेत नवीन सदस्‍यांचा प्रवेश बंद केला होता. तसेच कार्यकर्त्‍यांची बैठक घेऊन त्‍यांना चांगलेच खडसावले होते. 
- 'तुम्‍ही कायद्याचे पालन केले तरच तुम्‍ही इतरांना कायद्याचे पालन करा, असे सांगू शकता', असे योगी यावेळी कार्यकर्त्‍यांना म्‍हणाले होते. 
- 'आपण सत्‍ताधारी आहोत याचे भान ठेवा. स्‍वत:ची मानसिकता बदला. कार्यकर्त्‍यांनी कायदा हातात घेता कामा नये. सरकारी योजना सामान्‍यांपर्यंत नेण्‍यासाठी प्रयत्‍न करा. तुम्‍हाला सरकारी कामांमध्‍ये त्रुटी आढळली तर सरकारला ती गोष्‍ट लक्षात आणून द्या. सरकारी अधिकारी आणि सामान्‍यांशी सौजन्‍याने वागा', असा उपदेश योगी यांनी कार्यकर्त्‍यांना यावेळी दिला होता.  
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, योगींनी आपल्‍या मंत्र्यांसह लगावला झाडू...  
 
बातम्या आणखी आहेत...