आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष व्‍यवस्‍था करु नये, योगींचे होते आदेश; तरीही शहिदाच्‍या घरी लावला कुलर, सोफा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या सीआरपीएफच्या फौजदारांच्या घरी भेट दिली. तेथे त्यांच्यासाठी सोफ्याची खास सुविधा  तसेच गालिचा अंथरण्यात आला होता. याआधीसुद्धा मुख्यमंत्री योगी यांनी १२ मे रोजी देवरियातील शहीद प्रेम सागर यांच्या घरी भेट दिली होती तेव्हा जिल्हा प्रशासनाने त्यांच्यासाठी घरात एसी, सोफे  ठेवले होते. घराची रंगरंगोटीही केली होती.

विशेष म्हणजे, माझ्या पाहणी दौऱ्यात किंवा विशेष कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची सुविधा करू नये, असे आदेश मुख्यमंत्री याेगी यांनी २ जून रोजी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले होते. परंतु या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे शनिवारच्या घटनेवरून दिसून आले.  
 
शहिदांच्या घरी भेट देण्यात आल्या सर्व वस्तू
योगी यांनी शनिवारी काश्मीरमध्ये शहीद झालेल्या सीआरपीएफचे फाैजदार शुक्ला यांच्या घरी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी शहीद परिवाराच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांना ४ लाखांचा धनादेश आणि २ लाखांची मुदत ठेव दिली. कुटुंबीयांना उत्तर प्रदेश सरकार सर्वतोपरी मदत करेल. तसेच कुटुंबातील एकास नोकरी देण्याचे आश्वासनही दिले.  मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी प्रशासन आणि सा. बां.विभागाच्या वतीने शहिदाच्या घरी कूलर, सिंगल सेट सोफा, १२ डनलाव्हच्या खुर्च्या, एक्झॉस्ट फॅन, गालिचा आणि मॅट अशा विशेष सुविधा करण्यात आल्या. मात्र, या वेळी या सर्व वस्तू शहिदांच्या कुटुंबीयांना देण्यात आल्या. तर हे साहित्य परत नेले तरी आमची हरकत नाही, असे कुटुंबीयांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.  
 
बातम्या आणखी आहेत...