आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराची तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेलाच विवस्त्र होण्यास भाग पाडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - उत्‍तर प्रदेशमध्ये बलात्‍कार पीडि़तेबाबत पोलिसांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेचे एक प्रकरण समोर आले आहे. कानपूरमधील सत्‍ती गावाच्या पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकावर पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार करण्यासाठी आलेल्या अल्ववयीन मुलीबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ही मुलगी जेव्हा तक्रार करण्यासाठी ठाण्यात आली, त्यावेळी छळ करत तिला विवस्त्र होण्यास भाग पाडले.

पीडि़तेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पोलिस या मुलीला एका खोलीत घेऊन गेले आणि बलात्कार झाला की नाही हे तपासण्याचा बहाणा करत तिला कपडे काढण्यास सांगितले.' या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी वरिष्ठ अधिका-यांची भेट घेतली, त्यांनी या उपनिरीक्षकाच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.
बुधवारी गावातील लल्ली नावाच्या एका गुंडाने तिच्यावर अत्याचार केल्याचे या तरुणीने सांगितले आहे. तीने दिलेल्या तक्रारीनुसार लल्ली या 14 वर्षीय मुलीला बळजबरीने आपल्या बरोबर घरी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला.
फाइल फोटो : उत्‍तर प्रदेश्‍ा बलात्‍काराच्या विरोधात आंदोलन करणा-या महिला