आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-दीर सर्व तुरुंगात, भाजपने दिले तिकीट आता विधानसभेत जाणार नीलम करवरिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीलम करवरिया - Divya Marathi
नीलम करवरिया
लखनऊ - उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने 324 जागांवर एतिहासिक विजय मिळवला आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडी 54 जागात गुंडाळली गेली आहे. बसपाचा अंडर करंट असल्याचे बोलले जात होते त्यांना फक्त 19 जागांवर विजय मिळाला. मुलायमसिंहाची सून अपर्णा यादव यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या रीता बहुगुणा यांनी त्यांचा पराभव केला. मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे चिरंजीव पंकज विजयी झाले आहे.  भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांचा पराभव झाला आहे. 1991 च्या राममंदिर मुद्द्यापेक्षाही मोदी लाट जास्त यशस्वी ठरल्याची चर्चा आहे.
 
कोण आहे नीलम करवरिया
बाहुबली नेता उदयभान करवरिया यांची पत्नी नीलम करवरिया 20 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या नीलम यांना 67,807 मते मिळाली. त्यांच्या पतीपासून जेठ आणि दीर सर्व तुरुंगात कैद आहेत. त्यानंतरही भाजपने त्यांना तिकीट दिले आणि त्या बहुमताने विजयी झाल्या आहेत. 
 
- अदिती सिंह या लंडनचा जॉब साडून आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर रायबरेली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या आहेत. 
- भाजप उत्तर प्रदेशात 1985 पासून निवडणूक लढवत आहे. पहिल्या निवडणुकीत त्यांना 16 जागा होत्या.
- यंदाच्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे.
- 1991 मध्ये भाजपने राम मंदिरच्या मुद्द्यावर निवडणूक लढली होती. तेव्हा त्यांना 221 जागा मिळाल्या आणि कल्याणसिंह मुख्यमंत्री झाले होते. आता ते राज्यपाल आहेत.
- 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने 80 पैकी 73 जागांवर विजय मिळवला होता. यातील 328 विधानसभा मतदारसंघात भाजपला आघाडी होती. ही लाट 2017 मध्येही कायम राहिलेली पाहायला मिळाले.
- भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या स्वागत होणार असल्याचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.
- उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्याची निवड संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर केली जाईल, असेही शहांनी सांगितले. या स्पर्धेत सहा चेहरे आहेत.  

अपर्णा यादव पराभूत
अपर्णा यादव मुलायम सिंहाच्या सून आहेत. प्रतिक यांच्या पत्नी अपर्णा लखनऊ कँट येथून लढत होत्या. त्यांची टक्कर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या रीता बहुगुणा-जोशी यांच्यासोबत होती. अपर्णा यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्यासाठी मुलायमसिंहांनी येथे चार प्रचार सभा घेतल्या होत्या.

संगीत सोम विजयी
संगीत सोम हे मुझफ्फरनगर दंगलीनंतर चर्चेत आलेला चेहरा आहे. त्यांनी प्रशासनाला आव्हान दिले होते. बिहार निवडणूक काळात सोम यांच्यावर स्लॉटर हाऊस चालवण्याचा आरोप झाला होता. जाट मतदारांवरील त्यांची पकड पाहून मोदींनी आपल्या सभेत त्यांचे अभिनंदन केले होते. सोम हे कट्टर हिंदूत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. 
 
शिवपाल यादव विजयी
 समाजावादी पक्षातील यादवीनंतर कुटुंबातही दोन गट झाले होते. एक गट होता अखिलेश यादव यांचा तर दुसरा शिवपाल यांचा. वास्तविक नंतर अखिलेश यांनी शिवपाल यांना जसवंतनगर येथून तिकीट दिले. मुलायमसिंह यांनी पक्षाच्या निवडक उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यापैकी शिवपाल एक होते. 
 
मुख्तार अंसारी विजयी
 - मुख्तार अंसारी पूर्वांचलमधील बहुबली नेत्यांपैकी एक आहे. बहुजन समाज पक्षाच्या तिकीटवर त्यांनी निवडणूक लढवली. कृष्णनंद हत्या प्रकरणात ते तुरुंगात आहे. त्यांचा मुलगा अब्बासही निवडणूक लढवत होता. त्याची ही पहिली निवडणूक आहे. 
 
 पंकज सिंह विजयी
 - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह नोएडा येथून विजयी झाले आहे. 15 वर्षांपासून ते भाजपमध्ये काम करत आहेत. पक्षाने त्यांना प्रथमच उमेदवारी दिली. दोनवेळा ते पक्षाचे महासचिव आणि एकदा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. त्यांना तिकीट दिल्यानंतर सर्वांनीच घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्या विजयाकडे सर्वांचे लक्ष होते.  
 
राजा भैय्या विजयी 
 - राजा भैय्या अखिलेश सरकरामध्ये मंत्री होते. ते बाहुबली नेते मानले जातात. सलग 5 वेळा अपक्ष निवडणूक लढत कुंडा मतदारसंघावर त्यांचे एकछत्री अंमल आहे. भाजप सरकारमध्येही कॅबिनेट मंत्री होते. 1 लाख 36 हजार मते घेऊन ते आता सहाव्यांदा आमदार झाले.
 
2017 उत्तर प्रदेश विधानसभा निकाल
पक्ष  निकाल 403/403   2012 जागा 2014 लोकसभा 80 जागा
भाजप+ 325 47 73
सपा+काँग्रेस
54 224+28 5+2
बसपा  19 80 0
इतर  5 24 0
विजयी उमेदवार
आगरा कँट डॉ. गिरीराजसिंह धर्मेश भाजप 
आगरा ग्रामीण हेमलता दिवेकर भाजप 
आगरा उत्तर जगन प्रसात गर्ग भाजप 
आगरा दक्षिण योगेंद्र उपाध्याय भाजप 
अकबरपूर राम अचल राजबहादूर बसपा 
अजगरा कैलासनाथ सोनकर एसबीएसपी 
अकबरपूर रानिया प्रतिभा शुक्ला भाजप 
आलापूर अनिता भाजप 
अलिगंज सत्यपालसिंह राठोड भाजप 
अलिगड संजीव राजा भाजप 
अलाहाबाद उत्तर हर्षवर्धन वाजपेयी भाजप 
अलाहाबाद दक्षिण नंद गोपाल गुप्ता नंदी भाजप 
अलाहाबाद पश्चिम सिद्धार्थ नाथ सिंह भाजप 
अमनपूर देवेंद्र प्रताप भाजप 
अमेठी गरिमा सिंह भाजप 
अम्रितपूर सुशीलकुमार शाक्य भाजप 
अमरोहा महेबूब अली समाजवादी पक्ष 
अनुपशहर संजय भाजप 
आनलो धरमपाल सिंह भाजप 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...