आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण बहुमताच्या सरकारमुळे जगभरात भारताचा जयजयकार - नरेंद्र मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मऊ - पंतप्रधान नरेंद्र मोदींची येथे प्रथमच जाहीर सभा झाली. ते म्हणाले, 'उत्तर प्रदेशात आज काही ठिकाणी मतदान सुरु आहे. सर्वांना माहित आहे की यूपीमध्ये भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांचे सरकार स्थापन होणार आहे. केंद्रातील पूर्ण बहुमताच्या सरकारमुळे भारताचा जगभरात जयजयकार होत आहे. तुम्ही देखील भाजपला पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करा.' सोमवारी मोदींची चारवेळा आमदार राहिलेले बाहुबली नेते मुख्तार अंसारीच्या बालेकिल्ल्यात सभा झाली. या सभेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आमचे सहकारीही आमच्यासोबत 
- मोदी म्हणाले, 'मऊच्या मतदारांची मी क्षमा मागतो. 2014 मध्ये मी येथे येणार होतो. 10 मे रोजी माझ्या सभेची जय्यत तयारी झाली होती. मात्र आमचे एक सहकारी सुशील राय यांचे निधन झाले. सर्व कार्यकर्ते दुःखी झाले होते.'
- आज हे मैदान भाजपमय झाले आहे. येथे एक नाही तर तीन-तीन सभा असल्याचे चित्र दिसत आहे. जिकडे नजर जाईल तिकडे लोकच लोक दिसत आहे. 
- भाजपला यूपीमधून पूर्ण बहुमत मिळेल याचा विश्वास वाटत आहे. आमचे सर्व सहकारी पक्ष आमच्यासोबत आहेत. त्यांना घेऊन आम्ही सरकार स्थापन करणार. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...