आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP मध्ये तिसऱ्या टप्प्यात 61.16% मतदान, मुलायम म्हणाले सपाला मिळेल एकहाती सत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलायम सिंह यांनी सपाचा एकहाती सत्ता मिळण्याचा दावा केला आहे. यादव कुटुंबाने रविवारी सैफईमध्ये मतदान केले. - Divya Marathi
मुलायम सिंह यांनी सपाचा एकहाती सत्ता मिळण्याचा दावा केला आहे. यादव कुटुंबाने रविवारी सैफईमध्ये मतदान केले.
लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यांच्या 69 जागांसाठी 61.16% मतदान झाले. गेल्यावेळच्या तुलनेत मतदानात 1.19% वाढ झालेली पाहायला मिळाली. 2012 मध्ये याच 12 जिल्ह्यांत 59.97% टक्के मतदान झाले होते. सैफईमध्ये मुलायमसिंह यादव सह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने (पत्नी साधना, अखिलेश, शिवपाल, प्रतिक, डिंपल, अपर्णा) मतदान केले. यावेळी राज्यात सपाला बहुमत मिळणार असल्याचा दावा मुलायमसिंह यादव यांनी केला. 

तिसऱ्या टप्प्यात एकूण 826  उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.  2012  च्या  विधानसभा निवडणुकीत या 69 जागांपैकी 55 ठिकाणी सपाचे उमेदवार जिंकले होते. 
 
मोदींनी केले मतदान करण्याचे आवाहन.. 
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विट अकाऊंटवरुन लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. 
- अखिलेश यादव यांचे चुलत बंधु अक्षय यादव यांनी सकाळीच मतदानाचा अधिकार बजावला. ते म्हणाले, अखिलेश यांच्या नेतृत्वात राज्यात समाजवादीचे सरकार स्थापन होईल. 
- अखिलेश यादव यांनीही ट्विट करुन मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, उत्तर प्रदेशच्या विकासासाठी मोठ्या संख्येने मतदान करा. राज्यातील विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मतदान करा. 
- राज्यात होत असलेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानात अनेक दिग्गजांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यात मुलायमसिंहाची सून अपर्णा, शिवपाल यादव यासारखी मोठी नावे आहेत. 
 
या जिल्ह्यात झाले मतदान 
फरुखाबाद, हरदोई, कन्नोज, मैनपुरी, इटावा, औरेया, कानपूर, कानपूर ग्रामीण, उन्नाव, लखनऊ, बाराबंकी आणि सीतापूर यांचा मतदान झालेल्या जिल्ह्यांत समावेश आहे.
 
मुलायमांच्या सूनबाई ते तेजप्रतापच्या आजोबांपर्यंत
इटावा जसवंतनगर येथून शिवपाल यादव निवडणूक लढवत आहेत. अपर्णा यादव लखनऊच्या छावणीतून निवडणूक लढवत आहेत. अखिलेश यांचे बंधू अनुराग यादव लखनऊतील सरोजिनीनगरातून निवडणूक लढवत आहेत.

मुलायमचे बंधू अभय राम यांचे चिरंजीव आहेत. मुलायमसिंगाचे पुतणे जोगिंदरसिंग एटा येथील विधानसभा जागेवरून आणि मुलायमचे व्याही रामवीर यादव फिरोजाबाद येथून निवडणूक लढवत आहेत. मुलायम यांचे आणखी एक व्याही रामप्रकाश यादव शिकोहाबाद येथून निवडणुक लढवत आहेत.
 
आव्हाने
यादव परिवारात कलह
मुलायम यांची ताकद कमी होणे आणि अखिलेशची पकड मजबूत होणे यावर सपा कमकुवत होईल की आणखी मजबूत हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
मुलायम प्रचारापासून दूर
मुलायमसिंग यादव समाजवादी पक्षाचे स्टार प्रचारक होते; परंतु या निवडणुकीत त्यांनी शिवपालसिंगसाठी दोन सभा आणि अपर्णा या सुनेसाठी एक सभा घेतली.
शिवपाल यांचे बंड
शिवपाल यादव निवडणुकीनंतर दुसरा पक्ष स्थापन करू शकतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. अखिलेशवर ते नाराज आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...