आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यात 7 जिल्ह्यांच्या 49 जागांवर मतदान सुरू, मणिपूरमध्येही मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर - उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सहाव्या टप्प्यात आज ७ जिल्ह्यांतील 49 जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात मुलायम सिंह यांचा लोकसभा मतदार संघ असलेले आजमगड, योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ गोरखपूर आणि मऊचादेखिल समावेश आहे. आजमगड लोकसभा मतदारसंघात 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 2012 मध्ये सपाने 9 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी मुलायम यांनी त्यांच्या मतदारसंघात एकही सभा घेतसलेली नाही. या टप्प्यात भाजप 45 जागांवर, अपना दल 1 आणि भाजपबरोबर असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 3 जागांवर निवडणूक लढवत आहे. बसपा सर्व 49 तर सपा 40 आणि काँग्रेस 9 जागांवर निवडणूक लढवत आहे. मणिपूरमध्येही पहिल्या टप्प्यात 38 जागांसाठी मतदान सुरू आहे. 

UPDATES 
- आजमगड, बलिया, देवरिया, गोरखपूर, कुशीनगर, महाराजगंज, मऊ जिल्ह्यांत सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान करता येईल. 
- मणिपूरच्या चंदेलमध्ये सकाळी 3.5 तीव्रतेचा भूकंप आला. पण कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही. 
- गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांनी मत टाकल्यानंतर सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात भाजपला मोठे बहुमत मिळेल असे आदित्यनाथ म्हणाले. 
- अमित शाह यांनी ट्वीट केले, उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यातील सर्व मतदारांना विनंती आहे की, राज्यातील घराणेशाही, भ्रष्टाचार आणि गुंडाराज यातून उत्तर प्रदेशची मुक्तता करण्यासाठी मतदान करा. 

#2012 मध्ये कोणाला किती जागा मिळाल्या 
- सपा : 27
- बसपा : 09
- बीजेपी : 07
- काँग्रेस : 03
- आरएलडी : 00
- इतर : 03
 
बातम्या आणखी आहेत...