आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS: राम लाटेवर भारी मोदी लाट, अखिलेश यांचे 37 पैकी 28 मंत्री पराभूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिथे विकासाचे मुद्दे, तिथे सपा पराभूत, जिथे कसाब-कब्रस्तानचा उल्लेख, तिथे भाजपला फायदा  
- अखिलेशने आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेचा मुद्दा वापरला. एक्स्प्रेस महामार्ग जातो तिथे ६० जागा. तरीही सपा ५० जागी पराभूत.   
- मोदी-शहांनी फत्तेहपूर-गोरखपुरात कसाब-कब्रस्तानची विधाने केली. या भागात १५ जागा आहेत. भाजपने ११ जागा जिंकल्या.  
 
भाजपा+ १४ राज्ये, ५८ % लोकसंख्येत, 
काँग्रेस ७ राज्ये, ८ % लोकसंख्येतच गुंडाळली
२०१८ आधी ७ राज्यांत निवडणूक -
२०१७ त हिमाचल, गुजरात. २०१८त मप्र, राजस्थान, छ.ग.,कर्नाटक, मिझोराम. 
 
नोटाबंदी यशस्वी  आता यापुढे कुठली सक्ती?  
१.  बेनामी संपत्ती :
कायदा पूर्वीच मंजूर झाला. आता त्याचा अंमल सुरू होऊ शकतो. मोदी यास पुढील गेमचेंजर मानतात. 
२.  अनुदानात कपात :  मोदी लोकांना अनुदान सोडण्याचे आवाहन करत आहेत. आता एका निश्चित उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी ते अनिवार्य करू शकतात.  
३. बँक सुधारणा : बँक डिफॉल्टरविरुद्ध सक्ती शक्य. स्टेट बँकेचे विलीनीकरण त्यासाठीच. काही अशा संस्थाही स्वत:ला समोर आणत आहेत, ज्या बँकांत त्यांना मिळणारे कर्ज खरेदी करू शकतात आणि पुन्हा ते आपल्या ढंगानुसार, मनमानी पद्धतीने वसूल करतील.   
४. नोटबंदीत घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई :  नोटबंदीदरम्यान घोटाळा करणाऱ्या खासगी बँकांवर सक्ती. खात्यात मोठी रक्कम जमा करणाऱ्यांवर कारवाईला वेग. 
५.   तीन घटस्फोट :  ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशात मुस्लिम महिलांनी उघडपणे भाजपला मते दिली, त्यामुळे भाजप आता तीन तलाक संपविण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकते.    
 
मोदी राजयोग; उप्रत १३२ जागांवर सभा घेऊन ९६ जिंकल्या, ५ वर्षांत उप्रत ५ पट जागा वाढल्या
- ३ वर्षांनंतरही मोदी लाट कायम  हे स्पष्ट झाले. मोदींनी उप्रत दलितबहुल भागांतील ६४, मुस्लिमबहुल ७१ जागा जिंकून आतापासूनच २०१९ मध्ये ‘मोदी रिटर्न’चे वातावरण बनवले. याच वर्षी गुजरात व सार्वत्रिक निवडणुकीआधी १० राज्यांच्या निवडणुकीत भाजपला फायद्याचे संकेत.   
 
- मोदी उप्रत  २१ सभा घेऊन १३२ जागांवर पोहोचले. ९६ वर विजय. वाराणसीत तीन दिवस मुक्काम, रोड शोमुळे वाराणसीच्या ८, पूर्वांचलच्या १०८ जागांवर विजय.
 
- काही कठोर निर्णय घेतील. भ्रष्टाचाराविरुद्ध ‘दिसणारी’पावले उचलतील. { परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास, अर्थव्यवस्था वाढेल.  
- प्रादेशिक पक्ष भाजपविरोधात एकत्र येतील. भाजप ओडिशा, तामिळनाडूत प्रभाव वाढवेल. अकाली दलाची साथ सोडू शकतो.  
 
एकूणच लोकप्रियतेचा गुरू प्रबळ आहे. विरोधकांचा शनी उग्रच राहील. अर्थात, अतिउत्साह टाळावा लागेल. 
 
अखिलेश यांची ग्रहशांती
म्हणाले: कौटुंबिक लढाईमुळे पराभूत

२३५ सभा घेऊनही पराभवामुळे अखिलेश हे पक्ष आणि कुटुंबात एकाकी पडतील. कुटुंबातील मतभेद वाढणार. सपात पुन्हा फूट शक्य. अनेक नेते अखिलेश यांची साथ सोडून मुलायम-शिवपालसोबत जाऊ शकतात. 
 
राहुल काळ;  ५ वर्षांत २४ निवडणुकांत पराभव, २८ राज्यांत ३१% जागांवर अनामतही जप्त  
- राहुलच्या नेतृत्वात काँग्रेसचा ६३ महिन्यांत २४ निवडणुकांत पराभव. राहुलनी २६ दिवस खाट प्रवास केला. ४८ जिल्हे, १४ मंदिरे, ३ मशिदी, ६ दर्गे, ३ गुरुद्वारे, १ चर्चमध्ये गेले. ६० वर्षांत प्रथमच काँग्रेसला कमी जागा. ५ वर्षांत काँग्रेसची ३१% जागांवर अनामत जप्त.
 
-  राहुलच्या उप्रत ४० सभा. अखिलेशसह ७ रोड शो आणि १० सभा घेतल्या. १०० जागांवर उमेदवार दिले, पण फक्त ७ जागांवर विजयी. गेल्या वेळेपेक्षा २१ कमी.  
 
- काँग्रेस आघाडीचे सूत्र स्वीकारेल. लहान पक्षांना एकत्रित करेल. पण कमजोर काँग्रेसला नितीश, ममता आता जास्त महत्त्वच देणार नाहीत.  
- निवडणूक होणाऱ्या राज्यांत नेतृत्व बदल शक्य. म.प्र.-गुजरात, कर्नाटकांत अध्यक्ष बदल शक्य. प्रियंकांना पुन्हा आणण्याची मागणी होईल. 
 
मनोबल कमकुवत होईल, पण पक्षातील भाग्य प्रबळ राहील. पक्ष पंजाबच्या विजयाचे श्रेय देईल. चिंतन सुरू होईल.  
 
मायावतींची महादशा
मायांची टिप्पणी:मतदान यंत्रांनी दिला धोका
आधी लोकसभेत भोपळा, आता विधानसभेत २० पेक्षा खाली पोहोचल्या. दलित ही एकमेव प्रमुख मतपेढीही भाजपकडे वळली. पक्षात फुटीची शक्यता. पराभवासाठी ईव्हीएमने धोका दिल्याचा मायांचा आरोप.  
 
 
भाजपच्या आणखी ११ जागा वाढणार, बहुमत हुकले  
- २०१९ च्या आधी राज्यसभेतून ६८ खासदार निवृत्त होतील. त्यात १० जागा उप्रतून व १ जागा उत्तराखंडमधून रिक्त होईल.  
- म्हणजे भाजपच्या ११ जागा आणखी वाढतील. त्यामुळे पक्षाची एकूण संख्या ८५ तर यूपीएच्या ६५ होतील. पंजाब-मणिपूरमधून २०१९ पर्यंत एकही जागा रिक्त होणार नाही. त्यामुळे रालोआला बहुमत मिळणार नाही, पण यूपीए कमकुवत होण्याने विधेयक मंजूर करण्यात आता रालोआला जास्त अडचणी येणार नाहीत.  
 
जुलैत  भाजपच्या  पसंतीचा राष्ट्रपती  होणे  निश्चित
भाजपच्या पसंतीचा राष्ट्रपती होणार हे निश्चित. कारण ५ राज्यांतील निकालांनी त्याला आवश्यक मते दिली. भाजपसाठी उ. प्र.तून मिळालेली ६७६०० मते मूल्य निर्णायक ठरली. उत्तराखंडसह ५ राज्यांत जेवढ्या जागा भाजपला मिळाल्या, त्यामुळे सुमारे ९६५०८ मतमूल्य मिळेल. यूपीए-तिसरी आघाडीची एकत्रित मतेही रालोआएवढी नाहीत.  
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू राष्ट्रपती होण्याच्या स्पर्धेत सर्वात आघाडीवर.  
 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...