आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी समेट, सायंकाळी फूट; उत्तर प्रदेशात शिवपाल यांची अखिलेश, मुलायम यांच्याशी वाद मिटवण्यासाठी चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- निवडणूक तोंडावर असतानाही समाजवादी पार्टीतील कलह संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. सकाळी समेटाच्या बातम्या आल्या. शुक्रवारी अखिलेश-शिवपाल यांच्यात चर्चा झाली. मुलायम सिंह व आझम खान यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण झाले. परंतु त्याच वेळी मुलायम यांच्या गोटातून अमर सिंह व अखिलेश गोटातून रामगोपाल यादव यांची वक्तव्ये जारी झाली आणि सायंकाळी चार वाजता मुलायम व अखिलेश यांची संयुक्त पत्रकार परिषद ऐनवेळी बारगळली. दुसरीकडे पक्षाच्या चिन्हावर दावा करण्यासाठी प्रो. रामगोपाल निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे संकेत आहेत.

शिवपाल यांनी शुक्रवारी सकाळी अखिलेश यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. काका-पुतण्यात काही वेळ ही चर्चा चालली. त्यानंतर ते लगेच मुलायम यांना जाऊन भेटले. परंतु दोन्ही नेत्यांसोबतचा चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नव्हता.  त्यावर मात्र समाजवादी पार्टीतील नेत्यांनी मौन बाळगले हाेते. चर्चेदरम्यान राज्यसभा सदस्य अमर सिंह यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता पक्षातील काही नेत्यांंनी व्यक्त केली जात होती. समेटाची चिन्हे असतानाच सायंकाळी मुलायम व अखिलेश संयुक्त पत्रकार परिषद घेणार होते. परंतु ऐनवेळी ती रद्द झाली. शिवपाल यांच्यामुळेच कुटुंबासह पक्षात दुही निर्माण झाल्याचा आरोप करणारा गट आहे. ही दुही दूर करण्यासाठी समेटाचे प्रयत्न करणाऱ्या शिवपाल यांना यश आले नाही. 

२१२ आमदारांचा पाठिंबा
नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू असतानाच अखिलेश यादव यांचे समर्थक काका रामगोपाल यादव यांनी २२९ पैकी २१२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यात विधान परिषदेच्या ६८ पैकी ५६ व २४ पैकी १५ खासदारांचे समर्थन असल्याचा दावाही करण्यात आला. त्यासाठी रामगोपाल यादव यांनी समर्थक प्रतिनिधींच्या स्वाक्षरी संकलित करण्यात आल्या. पाठिंब्याची ही यादी निवडणूक आयोगाकडे दाखल केली जाणार आहे.

बालपण काकांच्या घरी गेले, आता विरोध
राजकारण विचित्र प्रकारचा खेळ आहे. अखिलेश यांना त्यांच्या काकांनी लहानाचे मोठे केले. काकांच्या घरीच त्यांचे बालपण गेले आहे. अखिलेश मला काका म्हणत असत. त्यांच्या शिक्षणापासून अनेक खासगी गोष्टीत त्यांचे  योगदान राहिले आहे. परंतु अखिलेश यांनी त्यांना आता बाजूला टाकले आहे. 

खात्यात ५०० कोटी, अखिलेशने पक्षाचे खाते गोठवले
अखिलेश यादव यांनी वडील मुलायम सिंह यांना आणखी एक झटका दिला आहे. त्यांनी पक्षाची सर्व बँक खाती गोठवली आहेत. त्या खात्यावर ५०० कोटींहून अधिक रक्कम असल्याचे सांगण्यात येते. रकमेचे व्यवहार शिवपाल यांच्या स्वाक्षरीने होत असत. प्रो. रामगोपाल म्हणाले, पक्षात समेटाची चिन्हे नाहीत.

बसपाची १०० उमेदवारांची यादी  
बहुजन समाजवादी पार्टीने १०० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यात २२ मुस्लिम समुदायातील उमेदवार आहेत. दोन्ही यादीत मिळून मुस्लिम समुदायातील ५८ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. अल्पसंख्यांकांना अधिक संधी देण्यात आली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...