आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS: उत्तर प्रदेशात 2014 च्या मतांपैकी 15% मते दुसऱ्याला गेली तरच BJPचा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- उत्तर प्रदेश देशाच्या राजकारणात महत्त्वाचे केंद्र ठरलेले राज्य आहे. येथील राजकारण केंद्राची दशा आणि दिशा ठरवते. या विधानसभा निवडणुकीकडे आगामी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिले जाते. भाजप जिंको किंवा हरो, दोन्ही परिस्थितीत भाजपसाठी निकाल ऐतिहासिक असतील. उत्तर प्रदेशात २०१४ च्या लोकसभा  निवडणूक निकालाचे विश्लेषण केले असता धक्कादायक वस्तुस्थिती निदर्शनास येते.  तसे पाहू जाता भाजपच्या पराजयाची शक्यता खूप धूसर वाटते.  या निवडणुकीत भाजप पराभूत झाला तर तो भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा निकाल असेल. कारण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. या पक्षाला ४३.६० % मते प्राप्त झाली आहेत अाणि ८० पैकी ७१ जागा मिळाल्या होत्या. तर अपना दल या घटक पक्षास दोन जागांवर विजय मिळाला होता. विधानसभेतील एकूण मतदारसंघाचे विश्लेषण केल्यास ३२८ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर होते. म्हणजे ८१ टक्के जागांवर भाजप आघाडीवर होता. असे उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा घडले आहे. १९७७ मध्ये येथील ८० % जागांवर विजय प्राप्त केला होता.  तथापि २०१४ ही केंद्राची निवडणूक होती, तर ही राज्याची निवडणूक आहे. दोहोंंच्या मताच्या पॅटर्नमध्ये खूप मोठा फरक असतो. मतदार राज्य आणि केंद्र अशा वेगवेगळ्या पातळीवर मतदान करतात. मुद्दे आणि प्राथमिकता वेगळी असते.

भाजपचा पराभव झाला तर सर्वात मोठे अपयश...
विजयाचे समीकरण   
- २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीचे विधानसभा जागांवार विश्लेषण सांगते की, राज्यात सपा, बसपा आणि काँग्रेस हे मोठे पक्ष असताना भाजपने ३२८ जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.  
- गेल्या चार विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण केले  तर कोणत्याही मतदारसंघात २५-३० टक्के मते मिळवणे आवश्यक अाहे. हाच विजयाचा सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे.  
- भाजपला ४०३ पैकी २५३ जागांवर ४० टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. ही आकडेवारी जादुई आकड्यांपेक्षा ५० ने जास्त आहे.  बिहारप्रमाणे विरोधी पक्षांची एकजूट झाली तरीसुद्धा भाजप अर्ध्याहून अधिक जागा जिंकू शकतो.  
- सुमारे ९४ विधानसभा मतदारसंघात भाजपला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. आतापर्यंत राज्यात इतक्या मोठ्या फरकाने कोणत्याही पक्षाला विजय मिळालेला नाही.  
- भाजपचा विजय इतका मोठा होता की, भाजप आणि घटक पक्षांची मतांची टक्केवारी २६  लोकसभा मतदारसंघात  सपा, बसपा आणि काँग्रेस मिळून त्यांच्या मतांच्या  टक्केवारीपेक्षाही जास्त होती.  
- सहा-सात लोकसभा मतदारसंघांत या तीन प्रमुख पक्षांची मते  आणि भाजपला मिळालेल्या मतांमध्ये फार थोडे अंतर होते. अगदी स्पष्टच करून सांगायचे असेल तर तिन्ही पक्षांनी आघाडी करून संयुक्त उमेदवार उभे केले तरीसुद्धा भाजपला लोकसभेच्या ३० जागांवर विजय मिळाला असता.

पराभवाचे गणित
- भाजप जर लोकसभा २०१४ च्या तुलनेत ४० टक्क्यांहून जास्त जागी पराभूत झाला तर तो सत्तेच्या स्पर्धेतून बाजूला फेकला जाईल. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांपैकी १५ टक्के एकगठ्ठा मते दुसऱ्या पक्षाला मिळाली तरच हे शक्य होईल.  
- भाजप २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवूनही बिहारच्या निवडणुकीत पराभूत झाला होता. उलट लाेकसभेत मिळालेल्या मतांमध्ये त्यांना फक्त ४ टक्के मते कमी मिळाली.  
- जर दोन विरोधी पक्ष एकत्र आले अाणि भाजपने १० टक्के मते गमावली तरच भाजपला निवडणुकीत सत्ता मिळवणे अवघड होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींचा पॅटर्न वेगळा आहे. दिल्लीची निवडणूक याचे उदाहरण आहे. लोकसभेत भाजपने दिल्लीमध्ये ५ जागांवर विजय मिळवला होता; परंतु विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवला हाेता. 
- इतका मोठा पराभव पत्करूनही भाजपच्या मतपेढीला जराही धक्का बसला नाही. केवळ काँग्रेसची मते आम आदमी पक्षाच्या पारड्यात गेली. यामुळे चित्रच बदलले.
 
पक्षांचा ताळेबंद असा: भाजपकडे संपत्ती सर्वाधिक तर काँग्रेसकडे देणगी जास्त
उत्तर प्रदेशच्या निवडणूक मैदानात जेवढे प्रमुख पक्ष मैदानात आहेत ते सर्व श्रीमंत आहेत. गंमत म्हणजे सर्व जण स्वत:ला गरिबांचे तारणहार  समजतात. सर्वाधिक संपत्ती भाजपकडे आहे. या पक्षाची एकूण संपत्ती ७५९ कोटी रुपयांची आहे. दुसरा क्रमांक काँग्रेसचा असून, त्या पक्षाची संपत्ती सुमारे ७०२ कोटींची आहे. तिसऱ्या क्रमांकावर सपा असून त्या पक्षाची एकूण संपत्ती ५८७ कोटी आहे. बसपा सुमारे ५२२ कोटी रुपयांसह चौथ्या स्थानी आहे. त्यानंतर रालोदची १९३ कोटींची संपत्ती आहे. 
बातम्या आणखी आहेत...