आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UP Government To Give 50 K Pensions To Yash Bharati And Padma Awardees

अमिताभ, जया, अभिषेकला दर महिना 50 हजार रुपये पेन्शन देणार UP सरकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - उत्तर प्रदेश सरकारने 'यशभारती' आणि 'पद्मसन्मान' प्राप्त पुरस्कर्त्यांना 50 हजार रुपये दर महा पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया आणि मुलगा अभिषेक यांना हा सन्मान मिळालेला आहे. त्याचा अर्थ एकाच कुटुंबातील या तिघांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याच बरोबर देशातील सर्वात जास्त रकमेची पेन्शन देणारा हा पुरस्कार झाला आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी या पेन्शन योजनेचे स्वागत करत ही रक्कम सामाजिक कामासाठी किंवा होतकरू गरीब कुटुंबाला देणार असल्याचे जाहिर केले आहे.
केव्हा झाली पुरस्काराची सुरुवात
उत्तर प्रदेशात 1994 मध्ये समाजवादी पक्षाचे सरकार होते तव्हा यश भारती पुरस्काराची सुरुवात झाली होती. चित्रपट, कला, साहित्य आणि क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. अभिषेक बच्चनला 2006 मध्ये या पुरस्काराने सन्मानित केले होते.

पहिल्या वर्षी यांना मिळाला यशभारती पुरस्कार
* डॉ. हरिवंशराय बच्चन
* अमिताभ बच्चन
* जया बच्चन
* गोपाल दास नीरज
* कैफी आझमी
* उस्ताद बिस्मिल्ला खाँ

यांच्याशिवाय आणखी 24 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पुरस्काराचे आणखी वैशिष्ट्य
> आतापर्यंत 150 जणांना मिळाला आहे हा पुरस्कार
> सुरुवातीला पुरस्काराची रोख रक्कम पाच लाख रुपये होती. नंतर ती वाढवून 11 लाख करण्यात आली
> दरवर्षी किती लोकांना हा पुरस्कार दिला जावा, याचे विशेष निर्देश नाहीत
> समाजावादी पक्ष सत्तेबाहेर गेल्यानंतर सत्तेत आलेल्या इतर सरकारांनी हा पुरस्कार बंद केला होता
> आता हा पुरस्कार देशातील सर्वात जास्त पेन्शन देणारा पुरस्कार झाला आहे

पुरस्काराने सन्मानित झालेली प्रमुख नावे
* हरिवंशराय बच्चन
* कैफी आझमी
* शबाना आझमी
* अमिताभ बच्चन
* जया बच्चन
* उस्ताद बिस्मिल्ला खाँ
* गिरिजा देवी
* सितारा देवी
* हरिप्रसाद चौरसिया
* नवाजुद्दीन सिद्दीकी
* श्रीलाल शुक्ल
* कुलदीप नायर
* राजपाल यादव
* मोहम्मद कैफ
* पं. छन्नूलाल मिश्र
* विश्वंभर सिंह
* अभिषेक बच्चन
* मलखान सिंह
* राजेंद्र यादव
* वसीम बरेलवी
* अनूप जलोटा
* जिम्मी शेरगिल
* अलका तोमर
* गीतकार समीर
* रेखा भारद्वाज
* कैलाश खेर
* जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी भद्राचार्य
* परमवीर चक्र विजेता योगेंद्र सिंह यादव
* पद्मभूषण गोपाल दास नीरज
* पद्मश्री राज बिसारिया
* गायिका मालिनी अवस्थी
* उदय प्रताप सिंह
* मुजफ्फर अली
* डॉ. योगेश प्रवीण
* जयकृष्ण अग्रवाल
* उर्मिल कुमार थपलियाल
* जगदीश गांधी
तुम्हाला हे देखिल माहित असले पाहिजे
> स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्य पत्नीला उत्तर प्रदेश सरकारकडून दर महा 20.129 रुपये पेन्शन
> स्वातंत्र्य सैनिकांच्या अविवाहित आणि बेरोजगार मुलींना उत्तर प्रदेश सरकारकडून दर महा 4770 रुपये
> जर एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाच्या दोन पत्नी असतील तर प्रत्येकीला 10,064 रुपये
बीसीसीआय पेक्षा जास्त पेन्शन
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) प्रथम श्रेणीच्या कमीत कमी 25 मॅच खेळणाऱ्या क्रिकेटर्सल दरमहा 15 हजार रुपये पेन्शन देते. ज्या खेळाडूंनी कमीत कमी 100 कसोटी खेळल्या आहेत त्यांना 50 हजार रुपये पेन्शन मिळते.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणाले अखिलेश यादव