आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यपालांनी राजभवनाची प्रतिष्ठा केली कमी : आझम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामपूर - आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेले उत्तर प्रदेशचे संसदीय कामकाज मंत्री आझम खान यांनी राज्यपाल राम नाईक यांच्यावर टीका केली आहे. राज्यपालांनी राजभवनाची प्रतिष्ठा कमी केली आहे. ज्यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरणांची नोंद आहे अशा व्यक्तींना राजभवनात प्रवेश देण्याची परवानगी आहे, असे खान यांनी म्हटले आहे.

आझम खान यांनी राज्यपालांवर यापूर्वीही टीका केली आहे. शनिवारी रामपूर आणि मुरादाबादमध्ये ‘डायल-१००’ योजनेचे उद््घाटन करताना ते म्हणाले की, राज्यपालांना राजकारण करण्याची एवढीच आवड असेल तर त्यांनी रामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूकच लढवावी.

यूपीचा वादग्रस्त अध्यादेश राष्ट्रपतींकडे पाठवला : उत्तर प्रदेश महानगरपालिका आणि नगरपालिकांचे महापौर आणि अध्यक्षांचे अधिकार सीमित करणारा अध्यादेश राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेला हा अध्यादेश राज्यपालांनी दोन वेळा परत पाठवला होता. राज्यपालांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हा अध्यादेश महानगरपालिकांची स्वायत्तता आणि घटनेच्या िवरोधात आहे. विशेष म्हणजे हा अध्यादेश कॅबिनेट मंत्री आझम खान यांनीच तयार केला आहे.
बातम्या आणखी आहेत...