आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UP Laxmikant Vajpayee And Dm Unnao Got In Debate

गंगेत मृतदेह: जिल्हाधिकारी सौम्या अग्रवाल आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्यात खडाजंगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उण्णाव (उत्तर प्रदेश) - येथील परियर गावाजवळून वाहणार्‍या गंगा नदीपात्रात आढळून आलेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यावरुन भारतीय जनता पक्ष आणि जिल्हा प्रशासन समोरासमोर आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी आणि जिल्हाधिकारी सौम्या अग्रवाल यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. एका व्हिडिओतून हा खुलासा झाला आहे.
गंगेच्या पात्रात सापडलेल्या मृतदेहांवर पुन्हा अंत्यसंस्कार केले जावे अशी भाजप प्रदेशाध्यक्ष वाजपेयी यांची मागणी होती. मात्र, काही कारणांमुळे ते शक्य नसल्याचे जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी बुधवारीच स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांच्यातील शाब्दीक चकमकीचा व्हिडिओ उघड झाला आहे. यात वाजपेयी आणि सौम्या अग्रवाल यांच्या खडाजंगी सुरु असल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये दिसते, की वाजपेयी म्हणतात, 'मी संध्याकाळी सात वाजतापासून येथे आहे. तुम्ही रात्री 11 वाजता येता आणि अंधारात मृतदेहांना पुरण्याचा प्रयत्न करत आहात. हे चुकीचे आहे. तुम्ही सकाळपर्यंत वाट का पाहात नाही. मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार केले पाहिजे.' यावर जिल्हाधिकारी सौम्या अग्रवाल म्हणतात,'तुम्ही हे का पाहात नाही, की आम्ही रात्रीच्या 11 वाजताही काम करत आहोत.'
बुधवारी सकाळी गंगेच्या पात्रात मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर उण्णाव प्रशासन कामाला लागले आणि त्यांनी डीएनए सँपल घेण्याचे काम सुरु केले. त्यानंतर तरंगणारे मृतदेह काढून पुरण्यात आले. यावरुन भाजप कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात नारेबाजी सुरु केली. उण्णावच्या जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा प्रशासन दिवसभर घटनास्थळी तळ ठोकून होते. मृतदेहांची वैद्यकीय तपासणी आणि डीएनए सँपलसाठी डॉक्टरांचे पथकही दाखल झाले होते.
बुधवारी सकाळी मृतदेहांचे दहन केले जाणार असे ठरले होते, मात्र दुपारी शासनाच्या निर्देशानुसार ते पुरण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान भाजप खासदार साक्षी महाराज आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी काम थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र, प्रशासनाने कडक भूमिका घेतल्यानंतर खासदार साक्षी महाराज यांनी काढता पाय घेतला.
केंद्र सरकारने राज्य सरकारकडून या प्रकरणाचा अहवाल मागविला आहे. राज्याचे मुख्य सचिव देबाशीष पांडा यांनी जिल्हाधिकारी अग्रवाल यांना अहवाल देण्यास सांगितले आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, जिल्ह्याधिकार्‍यांच्या नेतृत्वातील घटनास्थळी काम करणारे पथक