आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UP LUCK Fir Lodged Against Amitabh Thakur After Complaint Against Mulayam Singh

मुलायमसिंह यांच्याविरोधात तक्रार देणा-या ‘आयजी’विरुद्ध बलात्‍काराची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ (उत्‍तर प्रदेश) - समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी आपल्‍याला जीवे मारण्‍याची धमकी दिल्‍याची तक्रार देणारे उत्तर प्रदेशचे पोलिस महानिरीक्षक (सिव्हिल डिफेन्स) अमिताभ ठाकूर यांच्‍यावर बलात्‍काराचा गुन्‍हा दाखल झाला आहे. गाजियाबादच्‍या एका महिलेने या प्रकरणी शनिवार रात्री ठाकूर यांच्‍या विरोधात लखनौमधील गोमतीनगर पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. महिलेच्‍या तक्रारीच्‍या आधीच आयजी ठाकूर यांनी हजरतगंज पोलिस ठाण्यात यादव यांच्‍याविरोधा तक्रार दिली होती. त्‍यामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.
ठाकूर यांच्‍या पत्नीने जाहीर केला होता चर्चेचा ऑडियो
अमिताभ ठाकूर यांची पत्नी नूतन यांनी मुलायमसिंह आणि अमिताभ यांच्या शुक्रवार झालेल्या चर्चेचा ऑडिओ जाहीर केला. यात मुलायमसिंह यादल ठाकूर यांना धमकावताना स्‍पष्‍ट ऐकू येते. अमिताभ यांनी सांगितले, की माझ्या मोबाईलवर शुक्रवारी सायंकाळी चार वाजून 43 मिनिटांनी 0522-2235477 या क्रमांकावरुन फोन आला. मला सांगण्यात आले, की मुलायमसिंह यादव यांना माझ्याशी बोलायचे आहे. त्यानंतर आमच्यात सुमारे दहा मिनिटे चर्चा झाली. त्यांनी मला यावेळी धमकावले. दरम्‍यान, राजकीय नेत्‍यांच्‍या दबावामुळे आपल्‍या पतीविरुद्ध बलात्‍काराचा खोटा गुन्‍हा नोंदवल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
राजकीय पक्षांना आयते कोलित
भाजपचे प्रवक्ते डॉ. आय. पी. सिंह यांनी सांगितले, समाजवादी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचा हा धंदाच आहे. ते नेहमीच लोकांना धमकावत असतात. भाजपचे खासदार महंद आदित्यनाथ म्हणाले, वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखावर आरोप केले आहेत. याचे गांभिर्य यावरुन दिसून येते. राज्यात अराजकता पसरली आहे. कॉंग्रेस प्रवक्ते बिजेंद्र त्रिपाठी म्हणाले, मुलायमसिंह यांना असे धमकावणे शोभत नाही. यावरुन सिद्ध झाले आहे, की समाजवादी पक्षाचे सरकार गुन्हेगारी स्वरुपाचे आहे.
समाजवादी नेत्‍यांची चुप्‍पी
या प्रकरणात समाजवादी पक्षांच्‍या नेत्‍यांनी मात्र चुप्‍पी साधली आहे. आयजी ठाकूर यांच्‍याविरुद्ध खोटा गुन्‍हा दाखल केल्‍याची तक्रार दिली, अशी टीका विरोधक करत आहेत. पण, अद्याप समाजवादी पक्षाकडून त्‍याचे स्‍पष्‍टीकरण दिले गेले नाही.
पुढील स्लाईडवर बघा, अमिताभ ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीची कॉपी....